बसप आता पोटनिवडणूक लढविणार नाही
नामुष्कीजनक पराभवानंतर मायावतींची घोषणा
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तरप्रदेश, झारखंड अणि महाराष्ट्राच्या निवडणुकीत बसपच्या नामुष्कीजनक पराभवानंर मायावती यांनी रविवारी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार घडले आहेत. हे गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोग जोपर्यंत कठोर पावले उचलत नाही तोवर बसप देशात कुठेच पोटनिवडणूक लढविणार नाही असे मायावती यांनी म्हटले आहे. लोकसभा आणि राज्यांमधील विधानसभा निवडणूक पक्ष पूर्ण शक्तिनिशी लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
उत्तरप्रदेशात 9 विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक झाली असून त्याच्या निकालाने लोकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. पूर्वी मतपेटी पळवून गैरप्रकार केले जात होते. आता ईव्हीएमद्वारे निकाल बदलला जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. हा प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत दु:खाचा आणि चिंताजनक असल्याचे उद्गार मायावती यांनी काढले आहेत.
देशात जोपर्यंत बनावट मतदान रोखण्यासाठी आयोगाकडून ठोस पाऊल उचलले जात नाही तोवर आमचा पक्ष कुठलीच पोटनिवडणूक लढविणार नाही. प्रशासकीय ंत्र यंत्रणेचा सार्वत्तिक निवडणुकीत जनतेवर फारसा दबाव नसतो. याचमुळे बसप सार्वत्रिक निवडणूक लढविणार असल्याचे मायावती यांनी म्हटले आहे.