For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बसप प्रदेशाध्यक्षाच्या मारेकऱ्याचा एन्काउंटर

06:08 AM Jul 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
बसप प्रदेशाध्यक्षाच्या मारेकऱ्याचा एन्काउंटर
Advertisement

पोलीस कोठडीतून पलायनाच्या प्रयत्नात मारला गेला

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

तामिळनाडूत बसप प्रदेशाध्यक्ष के. आर्मस्ट्राँग यांच्या हत्येतील मुख्य आरोपीचा रविवारी सकाळी पोलिसांसोबतच्या एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला आहे. मारले गेलेल्या 30 वर्षीय आरोपीचे नाव तिरुवेंगदम होते. तो आर्मस्ट्राँग हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 11 संशयितांमध्ये सामील होता.

Advertisement

आरोपी तिरुवेंगदमने रविवारी सकाळी पोलीस कोठडीतून पलायन करण्याचा प्रयत्न केला, त्याने एका पोलिसावर हल्ला देखील केला. यादरम्यान एका पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या दिशेने गोळी झाडली, ज्यात तो जखमी झाला. तिरुवेंगदमला रुग्णालयात हलविण्यात आले, जेथे त्याचा मृत्यू झाला. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तिरुवेंगदमवर यापूर्वी अनेक गुन्हे नोंद होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

बसप प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग यांची 5 जुलै रोजी चेन्नईत त्यांच्या घरासमोर हत्या करण्यात आली होती. 52 वर्षीय आर्मस्ट्राँग हे स्वत:च्या घराबाहेर काही पक्षकार्यकर्त्यांसोबत बोलत असताना दोन दुचाकीवरून आलेल्या 6 गुंडांनी त्यांच्यावर चाकू आणि तलवारीने हल्ला केला होता. या हल्ल्यात आर्मस्ट्राँग यांचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी हत्येच्या काही तासांमध्येच एका टोळीशी निगडित 8 संशयितांना अटक केली होती. तर पुढील तीन दिवसांमध्ये तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते. पोन्नई व्ही. बालू, डी. रामू, के.एस. तिरुमलाई, डी. सेल्वराज, जी अरुल, के. मणिवन्नन, के. तिरुवेंगदम, जे. संतोष, गोकुल, विजय आणि शिवशंकर अशी त्यांची नावे आहेत.

आर्मस्ट्राँग यांच्या हत्येमागे गँगस्टर अर्कोट सुरेशच्या सहकाऱ्यांचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. अर्कोट सुरेशची मागील वर्षी हत्या झाली होती.  आर्मस्ट्राँग यांनीच सुरेशच्या हत्येचा कट रचला होता असे त्याच्या सहकाऱ्यांचे मानणे होते. आर्मस्ट्राँग यांच्या हत्येप्रकरणी अटक झालेल्या 11 आरोपींमध्ये सुरेशचा छोटा भाऊ पोन्नई देखील सामील आहे. चेन्नईच्या एका न्यायालयाने 11 जुलै रोजी या संशयितांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

स्टॅलिन विरोधात लढविली होती निवडणूक

आर्मस्ट्राँग यांनी द्रमुक प्रमुख एम.के. स्टॅलिन यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढविली होती. बसप नेते आर्मस्ट्राँग हे पेशाने वकील होते. 2006 मध्ये ते चेन्नई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते.  2011 मध्ये त्यांनी तामिळनाडूच्या कोलाथुर मतदारसंघात एम.के. स्टॅलिन यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढविली होती.

Advertisement
Tags :

.