महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बसप खासदार रितेश पांडे भाजपमध्ये सामील

06:27 AM Feb 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उत्तरप्रदेशात बसपला मोठा झटका

Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

Advertisement

लोकसभा निवडणुकीवरून एकीकडे राजकीय पक्ष उमेदवारांवरून मंथन करत आहेत. तर दुसरीकडे निवडणूक लढण्याची तयारी करत असलेले इच्छुक उमेदवार आता विजयी पक्षाचा शोध घेत आहेत. लोकसभा निवडणूक नजीक येऊ लागताच उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांना एका मागोमाग एक झटके बसू लागले आहेत. यापूर्वी अमरोहाचे बसप खासदार दानिश अली यांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी जवळीक साधल्याने पक्षातून हाकलण्यात आले होते. आता आंबेडकरनगरचे खासदार रितेश पांडे यांनी बसपला रामराम ठोकला आहे. रितेश पांडे आता भाजपमध्sय सामील झाले आहेत.

सार्वजनिक जीवनात बसपच्या माध्यमातून मी प्रवेश केला होता. त्यावेळी मायावती यांचे मार्गदर्शन लाभले आणि पक्ष सहकाऱ्यांचे सहकार्य मिळाले. पक्षाने मला उत्तरप्रदेश विधानसभा आणि लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी प्रदान केली होती. परंतु दीर्घकाळापासून पक्षाच्या बैठकांपासून मला दूर ठेवण्यात येत आहे. तसेच नेतृत्व स्तरावरून कुठलाही संपर्क साधला जात नाही. मी स्वत:हून संपर्क साधण्याचे अनेक प्रयत्न केले परंतु ते यशस्वी ठरले नाहीत असा दावा पांडे यांनी केला आहे.

अशा स्थितीत पक्षाला आता माझ्या सेवेची गरज नसल्याचे माझे मत तयार झाले आहे. यामुळे माझ्यासमोर पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाला त्यागण्याशिवाय कुठलाच पर्याय नाही. पक्षासोबतचे नाते तोडण्याचा हा निर्णय भावनात्मक स्वरुपात कठिण होता असे पांडे यांनी नमूद केले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article