बीएसएनएल लवकरच 4-जी फोन लाँच करणार
बीएसएनएलने लोकांचे लक्ष वेधून घेतले : बीएसएनएलचा रिचार्ज स्वस्त देण्याचा प्रयत्न
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जुलैमध्ये सर्व टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्या, त्यानंतर बीएसएनएलने लोकांचे लक्ष वेधून घेतले. बीएसएनएल लोकांना जिओ, व्हीआय आणि एअरटेलपेक्षा खूपच स्वस्त रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहे, ज्यामुळे बरेच लोक त्यांचे नंबर बीएसएनएलवर पोर्ट करत आहेत. याशिवाय बीएसएनएलचे 4-जी नेटवर्कही वेगाने वाढत आहे. अशाप्रकारे, बीएसएनएल झपाट्याने विस्तारत आहे.
देशात असे काही लोक आहेत जे जुने फोन वापरतात. अशा लोकांसाठीही बीएसएनएल एक नवीन सेवा सुरू करणार आहे. चला जाणून घेऊया काय आहे बीएसएनएलचा नवीन प्लान.
बीएसएनएल लवकरच आपला फोन लॉन्च करणार आहे. बीएसएनएलने कार्बन मोबाईल्सच्या भागीदारीत नवीन फोन लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी बीएसएनएलचा फोन जिओच्या फोनपेक्षा स्वस्त असू शकतो. बीएसएनएलच्या या नवीन फोनसोबत बीएसएनएल सिमही मिळणार आहे. या फोनवर ग्राहक हायस्पीड इंटरनेट चालवू शकतात. बीएसएनएलने स्थापना दिनी कार्बन मोबाईल सोबत सामंजस्य करार केला असल्याचे समजते.
बीएसएनएलचे लक्ष्य काय आहे?
देशाच्या कानाकोपऱ्यात परवडणारी 4जी कनेक्टिव्हिटी पोहोचवणे हे बीएसएनएलचे लक्ष्य आहे. बीएसएनएल कार्बन मोबाईलसोबत भारत 4 जी मोहीम धोरण अंतर्गत विशेष सिम हँडसेट बंडलिंग ऑफर सादर करणार आहे.