महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बीएसएनएल नवे सिम करणार सादर

06:47 AM Aug 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दूरसंचार विभागाची माहिती : पॅकेजअंतर्गत नवे सिम विकसित

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दूरसंचार विभागाने दिलेल्या माहितीनुसार भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएल लवकरच 4जी-5जी रेडि युनिव्हर्सल सिम आणि ओव्हर द एअर  लॉन्च करणार आहे. ही कंपनीची सिम वापरकर्ते कुठेही अॅक्टिव्हेट करू शकणार आहेत. 4 जी आणि 5जी सर्व्हिस सुरू केल्यानंतर वापरकर्त्यांना भौगोलिक निर्बंधाव्यतिरिक्त आपला मोबाईल नंबर निवडणे आणि सिम बदलण्यासाठी मदत होणार आहे. बीएसएनएलची सदरची सिम ही पायरो होल्डिंग प्राइव्हेट लिमिटेड यांच्या मदतीने तयार केली आहे. अलीकडेच केंद्रीय मंत्रिमंडळाने बीएसएनएलकरिता 89 हजार 47 कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर केले होते, त्या अंतर्गत कंपनीने नवीन सिम लॉन्च केले आहे.

सरकारची आर्थिक ऊर्जा

गेल्या काही वर्षापासून ही सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी कर्जाच्या संकटाने ग्रासलेली होती. कंपनीची हालत खराब होती. तिच्या सुधारणेकरीता म्हणून केंद्राने पुढाकार घेतलेला असून 2019 मध्ये 69 हजार कोटीचे पॅकेज देण्यात आले होते ज्यामुळे बीएसएनएल व एमटीएनएल यांच्यात स्थिरता आली होती. 2022 मध्ये 1.64 लाख कोटी मंजुर करण्यात आले. या रक्कमेतून आर्थिक स्थितीत सुधारणा करणे व फायबर यंत्रणा अधिक वेगाने कार्यरत करणे हे उद्दिष्ट साकारले जाणार आहे.

एअरटेल व जियो या दिग्गज कंपन्या वरील सेवेमध्ये पुढे असून या स्पर्धेत बीएसएनएल खूप मागे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6जी सेवेची मुहूर्तमेढ रोवलेली असून 2030 पर्यंत भारतात ही सेवा सुरु होईल, असे म्हटले जात आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article