महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘बीएसएनएल’ हजारो कोटींचे कंत्राट नोकियाला देणार?

07:00 AM Nov 17, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारतीय कंपन्यांमध्ये नाराजीचा सूर : ओटीएन कंत्राट नोकियाला देऊ शकते

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ही दूरसंचार कंपनी नोकिया कंपनीला ऑप्टिकल ट्रान्सपोर्ट नेटवर्क (ओटीएन) उपकरणांसाठी 1,000 कोटी रुपयांची खरेदी ऑर्डर देणार असल्याचे कळते. लवकरच ‘आगाऊ खरेदी ऑर्डर’ अपेक्षित आहे. नोकिया ऑप्टिकल नेटवर्कसाठी उपकरणे बीएसएनएलला पुरवेल आणि स्थानिक सिस्टम इंटिग्रेटरद्वारे त्याचे सेटअप हाताळणार असल्याचेही संकेत आहेत. नोकिया व्यतिरिक्त, टाटा ग्रुपच्या युनायटेड टेलिकॉम आणि तेजस नेटवर्क सारख्या स्थानिक कंपन्यांनी देखील बीएसएनएल करारासाठी अर्ज केला आहे. भारतीय दूरसंचार गीअर निर्माता टेक्सासने परवानगीपेक्षा जास्त बोली लावली, त्यामुळे करार गमावला लागला असल्याची माहिती आहे. प्राप्त अहवालानुसार, टेक्सासची बोली इतर बोलींपेक्षा 21 टक्के जास्त होती, जी मेक इन इंडियाअंतर्गत 20 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. यापूर्वी टाटा-मालकीच्या टेक्सास नेटवर्क्सने बीएसएनएल करारासाठी बोली सादर केली होती, परंतु ते एकमेव असल्याने त्यांची बोली नाकारण्यात आली. यानंतर बीएसएनएलने या वर्षी जूनमध्ये पुन्हा निविदा काढली होती. करारामध्ये तीन वर्षांच्या ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स  सेवा आणि आठ वर्षांसाठी सर्वसमावेशक वार्षिक देखभाल करार यांचाही समावेश आहे. याचाच अर्थ करार जिंकणारी कंपनी पुढील आठ वर्षांसाठी नेटवर्कच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी जबाबदार असेल.

भारतीय दूरसंचार उपकरण निर्माते बीएसएनएलवर नाराज

भारतीय दूरसंचार उपकरण निर्माते बीएसएनएलच्या नव्या करारावर नाराज आहेत. त्यांनी दूरसंचार मंत्र्यांना पत्र लिहून मदत मागितली आहे. भारतीय दूरसंचार कंपन्या भारतीय कंपन्यांना अपात्र ठरवल्याबद्दल आणि परदेशी कंपन्यांच्या बाजूने नियम बदलल्यामुळे बीएसएनएलवर नाराज आहेत. राकेश कुमार भटनागर, महासंचालक, व्हॉईस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्रायझेस (व्हॉइस) यांनी याबाबत नाराजी व्यक्त केलीय. ते असेही म्हणाले की बीएसएनएलने युनायटेड टेलिकॉम आणि तेजस नेटवर्कला निकृष्ट कारणास्तव अपात्र ठरवले आणि परदेशी कंपन्यांना अनुरूप मूलभूत अटी व शर्ती बदलल्या.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article