कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कणकुंबी भागातील बीएसएनएल टॉवर ‘असून अडचण नसून खोळंबा’

11:04 AM Oct 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मोठ्या प्रमाणात गैरसोय : अन्यथा बीएसएनएलकडे पाठ फिरवण्याची शक्यता

Advertisement

वार्ताहर/कणकुंबी

Advertisement

सध्या तालुक्याच्या पश्चिम भागातील बीएसएनएलचे मोबाईल टॉवर म्हणजे शोभेची वस्तू बनली आहे. बीएसएनएलच्या मोबाईल सेवेबद्दल जांबोटी-कणकुंबी भागात तीव्र नाराजी असून, टॉवर म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जांबोटी, कणकुंबी येथे सुरुवातीला बीएसएनएलचे टॉवर उभारले होते. त्यामुळे घरोघरी बीएसएनएलची ग्राहक संख्या वाढत गेली. मात्र नेटवर्क प्रॉब्लेम तसेच वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे व अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे मोबाईल सेवा वारंवार ठप्प होत आहे. वैतागलेल्या ग्राहकांनी कंटाळून बीएसएनएला रामराम ठोकून रिलायन्स व आता जिओ, एअरटेल अशा मोबाईल कंपनीचे फोन घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे साहजिकच याकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. आता सध्या जांबोटी, कणकुंबी भागात अगदी हातावर मोजण्या इतक्या व्यक्तीचे बीएसएनएल कार्ड असून, उर्वरित जिओ व एअरटेलचे फोन आहेत. मात्र कणकुंबी, भागातील बीएसएनएलचे सर्व टॉवर बंद असल्याने सेवा निष्फळ ठरली आहे.

टॉवर म्हणजे केवळ शोभेची वस्तू

प्रत्येक खेड्यामध्ये टॉवर उभारणीसाठी अनेक मोबाईल कंपन्या प्रयत्न करत असतानाच बेटणे, पारवाड, चोर्ला, चिगुळे, चिखले, हुळंद आदी गावांमध्ये बीएसएनएलचे टॉवर उभारले आहेत. मात्र बीएसएनएलचे टॉवर म्हणजे केवळ शोभेची वस्तू बनली आहे. ग्राहकांना उत्तमप्रकारे सेवा देण्यात बीएसएनएल अपयशी ठरत आहे. त्यामुळे शेवटी ग्राहक वर्ग कंटाळून अन्य मोबाईल कंपनीकडे धाव घेत आहे. यापुढे बीएसएनएलने चांगली सेवा दिली तरच ग्राहकांच्या पसंतीला उतरेल. अन्यथा पुन्हा बीएसएनएलकडे लोक पाठ फिरवतील यात शंका नाही.

झाडावर चढून नेटवर्क शोधण्याची वेळ

या भागातील स्थानिक नागरिकांबरोबरच सरकारी नोकर किंवा निमसरकारी कर्मचारी यांना एखाद्या कामासाठी संपर्क साधायचा झाला किंवा मेसेज पाठवायचा असेल तर उंच टेकडीवर किंवा झाडावर चढून नेटवर्क शोधावे लागते. अशा बिकट परिस्थितीत बीएसएनएलने आपली मोबाइल सेवा देऊन नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी कणकुंबी भागातील नागरिकांतून होत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article