‘बीएसएनएल’ 18 वर्षांत फक्त दुसऱ्यांदा नफा कमाईत
चौथ्या तिमाहीत 280 कोटींचा नफा : मागील वर्षी 849 कोटींचा तोटा
नवी दिल्ली :
दूरसंचार क्षेत्रातील भारतीय सरकारी कंपनी बीएसएनएलने 2024-25 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत 280 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 849 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, 2007 नंतर म्हणजेच 18 वर्षांत सलग दुसऱ्यांदा कंपनीने तिमाहीत नफा कमावला आहे.
यापूर्वी, कंपनीने 2024-25 या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) 262 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. बीएसएनएलने नुकतेच जानेवारी-मार्च तिमाही आणि वार्षिक निकाल जाहीर केले आहेत. 2024-25 या आर्थिक वर्षात बीएसएनएलचा निव्वळ तोटा 2,247 कोटी रुपयांवर आला आहे. ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, 2024-25 या संपूर्ण आर्थिक वर्षात बीएसएनएलचा निव्वळ तोटा 2,247 कोटी रुपयांपर्यंत कमी झाला आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात कंपनीला 5,370 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. आर्थिक वर्ष 25 मध्ये कंपनीचा महसूल 7.8 टक्क्यांनी वाढून 20,841 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्याच वेळी, 2024-25 या आर्थिक वर्षात कंपनीचा कामकाजातून मिळणारा महसूल 7.8 टक्क्यांनी वधारुन तो 20,841 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
बीएसएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ए रॉबर्ट जे रवी म्हणाले, ‘ही जलद वाढ व्यावसायिक व्यवस्थापन, सरकारी पाठिंब्यासह कंपनीने नोंदवली आहे. टॅरिफ न वाढवता कंपनी ग्राहकांना चांगली सेवा देण्याच्या दिशेने कार्यरत आहे.’