‘बीएसएनएल’ला टीसीएसकडून कंत्राट
नवीन 4 जीच्या कामासाठी 2,903 कोटींची नवी ऑर्डर
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ने बुधवारी सांगितले की, त्यांना भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कडून सुमारे 2,903 कोटी रुपयांची नवीन ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर 4जी मोबाइल नेटवर्कच्या नियोजन, अभियांत्रिकी, पुरवठा, स्थापना, चाचणी, कमिशनिंग आणि वार्षिक देखभालीसाठी आहे. टीसीएसने म्हटले आहे की, सर्व अटी, नियम आणि आवश्यक कागदपत्रे पूर्ण केल्यास बीएसएनएल लवकरच या ऑर्डरसाठी तपशीलवार खरेदी ऑर्डर जारी करेल.
15,000 कोटी रुपयांचा प्रकल्प आणि नवीन आव्हाने
टीसीएसने यापूर्वी बीएसएनएलकडून 15,000 कोटी रुपयांची मोठी ऑर्डर मिळवली आहे, ज्यामध्ये डेटा सेंटर आणि 4जी साइट्स बांधणे तसेच 5जी पायाभूत सुविधांचा पाया घालणे समाविष्ट आहे. परंतु आता या जुन्या ऑर्डरमधून मिळणारा महसूल हळूहळू कमी होत आहे.टीसीएसचे मुख्य वित्तीय अधिकारी समीर सेक्सारिया यांनी जानेवारीमध्ये विश्लेषकांना सांगितले होते की ‘बीएसएनएलने 5जी अपग्रेडसाठी रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (आरएफपी) जारी केले आहे. आम्ही 4जी प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केला आहे, म्हणून आम्ही त्यासाठी पात्र आहोत.