For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘बीएसएनएल’ची 4-जी सेवा ऑगस्टपासून

06:02 AM May 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘बीएसएनएल’ची 4 जी सेवा ऑगस्टपासून
Advertisement

देशभरात सुरु होणार सेवा : स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर होणार : पंजाबमधून सुरुवात करणार असल्याची माहिती

Advertisement

नवी दिल्ली :

सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या वर्षी ऑगस्टपासून देशभरात 4जी सेवा सुरू करणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने ही माहिती दिली. एजन्सीनुसार, बीएसएनएलची ही सेवा पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असेल. हे स्वदेशी तंत्रज्ञान आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आणि टेलिकॉम रिसर्च ऑर्गनायझेशन (सी डीओटी) यांचा समावेश असलेल्या कन्सोर्टियमने संयुक्तपणे विकसित केले आहे. याचा वापर करून बीएसएनएलने पंजाबमध्ये 4जी सेवा सुरू केली असून सुमारे 8 लाख ग्राहक जोडले आहेत.

Advertisement

पीटीआयच्या मते, बीएसएनएल अधिकाऱ्यांनी 4जी नेटवर्कवर 40-45 मेगाबिट्स प्रति सेकंदाच्या कमाल गतीचा दावा केला आहे, जो प्रायोगिक टप्प्यात 700 मेगाहर्ट्झ (एमएचझेड)च्या प्रीमियम स्पेक्ट्रम बँडमध्ये तसेच 2,100 एमएचझेड बँडमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी जुलैमध्ये हे तंत्रज्ञान बसवण्यात आले होते.अहवालानुसार, सी डीओटीचे 4जी तंत्रज्ञान कोर पंजाबमधील बीएसएनएल नेटवर्कमध्ये खूप चांगले कार्य करत आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये ते बसवण्यात आले.  सी-डीओटी कोअर अवघ्या 10 महिन्यात स्थिर झाले आहे.

5जी वर अपग्रेड होणार

टीसीएस, तेजस नेटवर्क्स आणि सरकारी मालकीच्या आयटीआयने बीएसएनएलकडून 4जी नेटवर्क तैनात करण्यासाठी सुमारे 19,000 कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळवल्या आहेत. हे नेटवर्कनंतर 5जी वर अपग्रेड केले जाऊ शकते.

1.12 लाख टॉवर बसवले जात आहेत

बीएसएनएल संपूर्ण भारतात 4जी आणि 5जी सेवांसाठी 1.12 लाख टॉवर्स बसवण्याच्या प्रक्रियेत आहे. कंपनीने देशभरात 4जी सेवेसाठी 9,000 हून अधिक टॉवर स्थापित केले आहेत. यापैकी 6,000 हून अधिक टॉवर पंजाब, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश आणि हरियाणा विभागामध्ये आहेत.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘बीएसएनएल गेल्या 4-5 वर्षांपासून फक्त 4जी-सक्षम सिम विकत आहे. अशा परिस्थितीत 4जी सेवेचा अनुभव घेण्यासाठी फक्त त्या ग्राहकांना जुने सिम काढून नवीन सिम घ्यावे लागेल.

Advertisement
Tags :

.