महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पाकिस्तानच्या गोळीबारात बीएसएफ जवान हुतात्मा

07:00 AM Nov 10, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तीन आठवड्यात तिसऱ्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन : शोपियान चकमकीत दहशतवादी ठार

Advertisement

त्तसंस्था /जम्मू

Advertisement

जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात गुऊवारी पाकिस्तानकडून गोळीबार झाला. रामगढ सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवरील नयनपूर चौकीजवळ झालेल्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान जखमी झाला. त्यानंतर त्याचा ऊग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. लाल फर्न किमा असे या जवानाचे नाव आहे. तीन आठवड्यात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची ही तिसरी वेळ आहे. 17 ऑक्टोबर रोजी पाक रेंजर्सनी पहिला गोळीबार केला होता. यामध्ये बीएसएफचे दोन जवान जखमी झाले. त्यानंतर 26 ऑक्टोबरला दुसऱ्यांदा जम्मूच्या अरनिया आणि सुचेतगड सेक्टरमध्ये पाकिस्तानी रेंजर्सनी केलेल्या गोळीबारात बीएसएफ जवान आणि एक महिला जखमी झाली. आता बुधवारी मध्यरात्रीनंतर शोपियानच्या कटोहलन भागात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये प्रतिबंधित दहशतवादी संघटना द रेझिस्टन्स फ्रंटचा (टीआरएफ) एक दहशतवादी मारला गेला.

मारल्या गेलेल्या दहशतवाद्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. इतर दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. पहाटे चार वाजता गोळीबार थांबल्याची माहिती स्थानिकांनी दिली. तसेच मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास एका जखमी बीएसएफ जवानाला येथे आणण्यात आले. त्याला गोळी लागली होती. आम्ही सैनिकावर योग्य प्राथमिक उपचार करून त्याला लष्करी ऊग्णालयात पाठवले आहे. अशा घटनांमध्ये तत्काळ वैद्यकीय मदत मिळावी यासाठी आम्ही स्वतंत्र टीम तयार केली आहे. रात्री आम्हाला गोळीबाराचे आवाज ऐकू आले, त्यामुळे आमची संपूर्ण टीम अलर्ट मोडवर होती, असे जवानावर उपचार करणाऱ्या सामुदायिक आरोग्य केंद्राच्या डॉ. शमशाद यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article