महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बीएसएफ हेड कॉन्स्टेबल नक्षली हल्ल्यात हुतात्मा

07:00 AM Dec 15, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

छत्तीसगडमध्ये आयईडी स्फोट, सलग दुसऱ्या दिवशी हल्ला

Advertisement

वृत्तसंस्था /रायपूर

Advertisement

छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात गुऊवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या स्फोटात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान हुतात्मा झाला. गेल्या दोन दिवसांतील हा दुसरा हल्ला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नव्याने घडलेली घटना परतापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सदाकटोला गावाजवळ घडली. बीएसएफ आणि जिल्हा पोलीस दलाचे संयुक्त पथक गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवल्याने बीएसएफ हेड कॉन्स्टेबलला प्राण गमवावा लागला. नक्षलवाद्यांनी केलेल्या स्फोटात बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल अखिलेश राय (45) जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना प्राथमिक उपचार देण्यात आले आणि पुढील वैद्यकीय सेवेसाठी पखंजूर येथे पाठविण्यात आले. मात्र, अधिक उपचारार्थ अन्य इस्पितळात हलविण्याच्या हालचाली सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हुतात्मा अखिलेश राय हे मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. नक्षलवाद्यांनी घडवलेल्या या स्फोटानंतर बीएसएफ, जिल्हा राखीव रक्षक आणि जिल्हा पोलीस दलाच्या संयुक्त पथकाकडून परिसरात शोध मोहीम राबविण्यात आली. मात्र, नक्षलवाद्यांचा थांगपत्ता लागू शकला नाही. घनदाट जंगलभागात नक्षलवाद्यांनी पोबारा केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यापूर्वी बुधवारी राज्याच्या नारायणपूर जिह्यात नक्षलवाद्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या पथकावर हल्ला केल्याने छत्तीसगड सशस्त्र दलाचा (सीएएफ) एक सैनिक हुतात्मा झाला होता. तसेच या हल्ल्यात जखमी झालेल्या दुसऱ्या जवानावर सध्या उपचार सुरू आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article