स्कॉटलंड संघाचे नेतृत्व ब्राईसकडे
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
ऑक्टोबर महिन्यात संयुक्त अरब अमिरातमध्ये आयसीसीची महिलांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भरविली जाणार आहे. या स्पर्धेसाठी स्कॉटलंडच्या महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व कॅथरीन ब्राईसकडे सोपविण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या स्कॉटलंडच्या महिला संघाचे उपकर्णधारपद सारा ब्राईसकडे सोपविण्यात आले आहे. स्कॉटलंड संघामध्ये अनुभवी फिरकी गोलंदाज अब्ताहा मकसुदचा समावेश करण्यात आला आहे. स्कॉटलंडचा या आगामी स्पर्धेत ब गटात समावेश असून इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, विंडीज आणि बांगलादेश यांचा सहभाग आहे. गेल्या वर्षी झालेल्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात द. आफ्रिकेचा 19 धावांनी पराभव करुन जेतेपद मिळविले होते.
स्कॉटलंड महिला संघ: कॅथरीन ब्dरायस (कर्णधार), सारा ब्रायस (उपकर्णधार), लोमा ब्राऊन, ड्रुमंड, अब्ताहा मकसूद, एस. हॉर्ले, अॅबेल, पी. चटर्जी, मेगान मॅकॉल, कार्टर, लिस्टर, रिने, स्लेटर, फ्रेजर आणि बेल.