कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निवृत्त राज्य पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या

06:35 AM Apr 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

निवृत्त पोलीस महासंचालक ओमप्रकाश यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला आहे. बेंगळूरमधील एचएसआर लेआऊटमधील घरात मृतदेह आढळला असून त्यांचा खून झाल्याचे वृत्त आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, पत्नी पल्लवी यांनीच ओमप्रकाश यांचा खून केल्याची माहिती मिळाली आहे. पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिची चौकशी सुरू असल्याचे समजते. ओम प्रकाश यांची पत्नी गेल्या अनेक दिवसांपासून मानसिक नैराश्याने ग्रस्त होती आणि तिच्यावर सतत उपचार सुरू होते, अशी माहिती मिळाली आहे. ओमप्रकाश यांचे पार्थिव विच्छेदनासाठी सेंट जॉन्स ऊग्णालयात पाठवण्यात आले आहे. 68 वषीय ओमप्रकाश 1981 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. 2015 मध्ये sते डीजी आणि आयजीपी झाले होते. तसेच राज्याचे 38 वे डीजी आणि आयजीपी होते. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.

Advertisement

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article