महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बीआरएस नेत्याच्या कारची धडक, महिलेचा मृत्यू

06:49 AM Jul 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ हैदराबाद

Advertisement

तेलंगणाच्या हनुमाकोंडा जिल्ह्dयात बीआरएसचे माजी आमदार टी. राजैया यांच्या  कारची धडक बसल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील मडीकोंडा येथे शनिवारी रात्री रस्ता ओलांडत असताना या महिलेला राजैया यांच्या कारने धडक दिली होती.

Advertisement

दुर्घटनेवेळी कार आमदार चालवित नव्हते. परंतु राजैया दुर्घटनेवेळी कारमधून प्रवास करत होते. महिलेला धडक बसल्यावर कार काही अंतरानंतर रोखण्यात आली. दुर्घटनेत सामील कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. तर मृत महिलेच्या पतीने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे. पोलिसांनी दुर्घटना नोंदवून घेत तपास सुरू केला आहे. मागील काही काळात अनेक राजकीय नेते आणि बिल्डर्सच्या वाहनांनी धडक दिल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. यात आता तेलंगणातील घटनेची भर पडली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article