For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बीआरएस नेत्या कविताचा जामीन अर्ज फेटाळला

06:19 AM Apr 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
बीआरएस नेत्या कविताचा जामीन अर्ज फेटाळला
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने मद्य धोरण प्रकरणात के. कविता यांचा जामीन अर्ज फेटाळला. के. कविता यांनी आपल्या मुलाच्या परीक्षेचे कारण देत जामीन मागितला होता. मात्र, न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता करण्यास नकार दिला आहे. कविता यांना मद्य प्रकरणी अटक करण्यात आली असून त्या सध्या दिल्लीच्या तिहार तुऊंगात बंद आहेत.

दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेत्या के. कविता यांनी गुऊवारी येथील न्यायालयात अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता. आपल्या 16 वर्षांच्या मुलाची परीक्षा सुरू असून त्याला आईच्या नैतिक आणि भावनिक आधाराची गरज असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला होता. विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्या खंडपीठाने कविता यांच्यासह अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) हजर असलेल्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून निकाल राखून ठेवला होता. याबाबत सोमवारी आपला निर्णय दिला असून कविता यांची जामिनावर सुटका करता येणार नसल्याचे जाहीर केले. ईडीने कविताला 15 मार्च रोजी हैदराबाद येथील बंजारा हिल्स येथील राहत्या घरातून अटक केली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.