कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

37 वर्षांपासून बेपत्ता भावाचा एसआयआर प्रक्रियेमुळे शोध

06:22 AM Nov 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यात एसआयआरदरम्यान  कमाल घडली आहे. मतदारयादीच्या फेरपडताळणी प्रक्रियेने जवळपास 4 दशकांपासून दूरावलेल्या एका परिवाराला पुन्हा एकत्र आणले आहे. चक्रवर्ती परिवाराने 1988 मध्ये स्वत:चा ज्येष्ठ पुत्र विवेक चक्रवर्तीला गमावले होते. घरातून बाहेर पडलेल्या विवेकचा कुठलाच थांगपत्ता लागला नव्हता. अनेक वर्षांपर्यंत शोध घेण्यात आला, परंतु कुठलाच सुगावा लागला नाही. परत कधी तो भेटेल अशी अपेक्षाही नसताही एसआयआर अभियानाने त्याचा शोध लावला.

Advertisement

विवेक यांच्या छोट्या भावाचे नाव प्रदीप चक्रवर्ती असून तो याच भागातील बूथ लेव्हल अधिकारी  आहे. एसआयआर दरम्यान प्रत्येक अर्जावर त्याचे नाव आणि मोबाइल क्रमांक नमूद होता. विवेकचा पुत्र कोलकात्यात राहतो, जो स्वत:च्या काकाविषयी काहीच जाणत नव्हता. त्याने दस्तऐवजांच्या मदतीसाठी प्रदीप यांना फोन केला, प्रथम कागदपत्रांविषयी संभाषण झाले, मग परिवाराचे बंध समोर आले.

माझा मोठा भाऊ 1988 मध्ये अखेरचा घरी आला होता. त्यानंतर तो बेपत्ता होता. आम्ही त्याला सर्वत्र शोधले, परंतु त्याने सर्व नातेसंबंध तोडले, परंतु या मुलाशी संपर्क झाल्यावर मी स्वत:च्या पुतण्याशी बोलत असल्याचे जाणीव झाल्याचे प्रदीप यांनी सांगितले आहे.

भावाचा थांगपत्ता लागल्यावर प्रदीप हे स्वत: विवेक यांच्याशी बोलले. या भावनेला शब्दांमध्ये व्यक्त करू शकत नाही. 37 वर्षांनी मी घरी परतत आहे. घरातील सर्व लोकांशी बोललो आहे. निवडणूक आयोगाचे आभार मानतो, कारण एसआयआर प्रक्रिया नसती तर हे मिलन कधीच शक्य झाले नसते असे विवेक यांनी म्हटले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article