For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ब्रुकच्या नाबाद अर्धशतकाने इंग्लंडला सावरले

06:00 AM Aug 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
ब्रुकच्या नाबाद अर्धशतकाने इंग्लंडला सावरले
Advertisement

लंकेविरुद्ध पहिली कसोटी, फर्नांडोचे 3 बळी

Advertisement

वृत्तसंस्था/मॅचेंस्टर

हॅरी ब्dरुकच्या नाबाद अर्धशतकाने येथे सुरू असलेल्या लंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत इंग्लंडला सावरले. या कसोटीत लंकेचा पहिला डाव 236 धावांवर आटोपल्यानंतर इंग्लंडने गुरुवारी चहापानापर्यंत 4 बाद 176 धावा जमविल्या. ब्रुक 53 धावांवर खेळत आहे. इंग्लंडचा संघ अद्याप 60 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 6 गडी खेळावयाचे आहेत. या कसोटीत लंकेच्या पहिल्या डावात 236 धावा झाल्या. कर्णधार धनंजय डिसिल्वा आणि मिलन रत्ननायके यांनी शानदार अर्धशतके झळकविली. डिसिल्वाने 84 चेंडूत 8 चौकारांसह 74 तर रत्ननायकेने 135 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह 72 धावा जमविल्या. कुशल मेंडीसने 4 चौकारांसह 24, चेंडीमलने 2 चौकारांसह 17, कमिंदु मेंडीसने 1 चौकारासह 12, प्रभात जयसुर्याने 1 चौकारासह 10 तर विश्वा फर्नांडोने 2 चौकारांसह 13 धावा जमविल्या. इंग्लंडतर्फे वोक्स आणि शोएब बशीर यांनी प्रत्येकी 3 तर अॅटकिनसनने 2 गडी बाद केले. मार्क वूडने 1 बळी मिळविला. इंग्लंडने बिनबाद 22 या धावसंख्येवरुन गुरूवारी दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ झाला. पावसामुळे उपाहारापर्यंतच्या पहिल्या सत्रात केवळ 4 षटकांचा खेळ झाला.

Advertisement

संक्षिप्त धावफलक : लंका प. डाव: 74 षटकात सर्व बाद 236 (धनंजय डिसिल्वा 74, रत्ननायके 72, कुशल मेंडीस 24, चंडीमल 17, कमिंदु मेंडीस 12, जयसुर्या 10, विश्वा फर्नांडो 13, अवांतर 8, वोक्स 3-32, शोएब बशीर 3-55, अॅटकिनसन 2-48, वूड 1-31), इंग्लंड प. डाव (चहापानापर्यंत) 37 षटकात 4 बाद 176 : (डकेट 18, लॉरेन्स 30, पोप 6, रुट 42, ब्रुक खेळत आहे 53, स्मिथ खेळत आहे 22, अवांतर 5, आसिता फर्नांडो 3-46, विश्वा फर्नांडो 1-34)

Advertisement
Tags :

.