For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत युवराज मोहनगेकरला कास्य

06:01 AM Jan 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत युवराज मोहनगेकरला कास्य
Advertisement

बेळगाव/ क्रीडा प्रतिनिधी

Advertisement

दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय तालकटोरा श्यामाप्रसाद मुखर्जी जलतरण तलावात घेण्यात आलेल्या 67 व्या राष्ट्रीय स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या स्पर्धेत डायव्हिंग  प्रकारात बेळगाव आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबचा जलतरणपटू व सेंट झेवियर स्कूलच्या विद्यार्थी युवराज मोहनगेकर डायव्हिंगमध्ये कास्य पटकावित यश संपादन केले आहे.

दिल्ली येथे घेण्यात आलेल्या या स्पर्धेत कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करताना मुलांच्या 14 वर्षाखालील गटात 1 व 3 मी. स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करताना कांस्यपदक पटकावले. 1 मी. स्प्रिंग बोर्ड प्रकारात तृतीय क्रमांकासह कास्यपदक संपादन केले.

Advertisement

केंद्रीय विद्यालय 2 चा विद्यार्थी अर्णव अच्युत कुलकर्णीने 3 मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग प्रकारात चौथा क्रमांक मिळवला. मयुरेश जाधव जीएसएस कॉलेज याने 1 मी. स्प्रिंग बोर्ड डायव्हिंगमध्ये पाचवा क्रमांक मिळविला तसेच वेदा खानोलकर जी. जी. चिटणीस स्कूल हिने 100 मी. बटरफ्लायमध्ये पाचवा क्रमांक मिळवला.

वरील सर्व जलतरणपटूंना आबा व हिंद क्लबचे एनआयएस जलतरण प्रशिक्षक  विश्वास पवार, शिवराज मोहिते यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. तर क्लबचे चेअरमन अॅड. मोहन सप्रे अध्यक्ष अरविंद संगोळी, शितल हुलबत्ते तसेच स्कूलचे मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षकांचे प्रोत्साहन लागते. राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत  स्विमर्स व अक्वेरियस क्लबच्या जलतरणपटूंनी घवघवीत या संपादन केले आहेत.

Advertisement
Tags :

.