महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नेमबाज रुबिना फ्रान्सिसला कांस्य

06:50 AM Sep 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पॅरालिम्पिकमध्ये भारताला पाचवे पदक : रुबिनाची 10 मी एअर पिस्तूलमध्ये शानदार कामगिरी

Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

Advertisement

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये तिसऱ्या दिवशी भारताला आणखी एक कांस्यपदक मिळाले आहे. भारताची नेमबाज रुबिना फ्रान्सिसने पी2 महिला 10 मीटर एअर पिस्तुल एसएच1 प्रकारात कांस्यपदक मिळवले. 211.1 गुणांसह अंतिम फेरीत तिने तिसरे स्थान पटकावले. विशेष म्हणजे, अंतिम फेरीत रुबिनाने दुसऱ्या स्थानापर्यंत मजल मारली होती पण अखेरच्या काही शॉट्समध्ये तिला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या प्रकारात इराणची सारा जवानमर्दीने 236.8 गुणांसह सुवर्णपदक तर तुर्कीची इसेल ओझगनने 231.1 गुणांसह रौप्य पदक जिंकले.

मध्य प्रदेशातील जबलपूरची रहिवासी असलेल्या रुबिनाने मोठ्या संघर्षातून पॅराशूटर म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. रुबिना ही रिकेट्स या आजाराने त्रस्त आहे, यामध्ये हाडांच्या वाढीवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत हार न मानता रुबिनाने पॅरालिम्पिकमध्ये यश मिळवले आहे. रुबिनाने पात्रता फेरीत सहावे स्थान मिळवत अंतिम फेरी गाठली होती. यानंतर अंतिम फेरीत मात्र तिने कमाल केली. रुबिनाने अंतिम फेरीत सुरुवातीपासूनच चांगली कामगिरी केली. पण त्यानंतर काही शॉट्समध्ये कमी पडल्याने अव्वल तीनमधून बाहेर पडली होती. परंतु, नंतर तिने पुनरागमन करत पुन्हा अव्वल तीनमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे तिने दुसऱ्या स्थानापर्यंत झेप मारली होती पण अखेरच्या काही शॉट्समध्ये तिला तिने 211.1 गुणांसह तिसरे स्थान पटकावले.

नेमबाजीत चार पदके

शुक्रवारी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी नेमबाजीत भारताने तीन पदके पटकावली आहेत. रुबिनाचे हे नेमबाजीतील चौथे पदक आहे. याआधी भारताकडून खेळताना महिलांची 10 मीटर एअर रायफल प्रकारात अवनी लेखराने सुवर्ण तर मोना अग्रवालने कांस्यपदक पटकावले आहे. यानंतर भारतीय नेमबाज मनीष नरवालने 10 मीटर एअर पिस्तूल पुरुष प्रकारात रौप्यपदक पटकावले होते. यानंतर शनिवारी रुबिनाने कांस्यपदक जिंकत नेमबाजीत भारताला चौथे पदक मिळवून दिले. आता भारताकडे 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 3 कांस्यपदके आहेत.

बॅडमिंटनमध्ये सुकांत कदमचे पदक पक्के

पॅरा शटलर सुकांत कदमने पुरुष एकेरीच्या एसएल 4 गटातील उपांत्यपूर्व लढतीत थायलंडच्या सिरिपोंग तिमारोमचा 25 मिनिटांत 21-12, 21-12 असा पराभव केला. या गटात सलग दुसऱ्या विजयासह कदमने उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले. आता, उपांत्य फेरीत त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

पॅरालिम्पिकमधील भारताचे पदक विजेते

  1. अवनी लेखरा (नेमबाजी) - सुवर्णपदक, महिला 10 मीटर एअर रायफल
  2. मोना अग्रवाल (नेमबाजी) - कांस्यपदक, महिला 10 मीटर एअर रायफल
  3. प्रीती पाल (अॅथलेटिक्स) - कांस्यपदक, महिलांची 100 मीटर शर्यत
  4. मनीष नरवाल (नेमबाजी) - रौप्य पदक, पुरुष 10 मीटर एअर पिस्तूल
  5. रुबिना फ्रान्सिस (नेमबाजी) - कांस्य पदक, महिला 10 मीटर एअर पिस्तूल.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article