सिफ्त कौर सामराला कांस्य पदक
वृत्तसंस्था/म्युनिक
येथे सुरू असलेल्या आयएसएसएफच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताची महिला नेमबाज सिफ्त कौर सामराने गुरुवारी महिलांच्या 50 मी. रायफल थ्री पोझीशन प्रकारात कांस्यपदक मिळविले. या क्रीडा प्रकारात नॉर्वेच्या जिनेटी हेग डस्टेडने 466.9 गुणासह सुवर्णपदक, स्वीसच्या इमेली जेगीने 464.8 गुणासह रौप्य पदक तर भारताच्या सामराने 453.1 गुणासह कांस्यपदक मिळविले. 2022 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीच्या या क्रीडा प्रकारात 23 वर्षीय सामराने सुवर्णपदक पटकाविले होते. सामरा ही पंजाबमधील फरिदकोटची रहिवासी असून तिने या वर्षाच्या प्रारंभी ब्युनोस आयरीस येथे झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत तिने निराशा केली. महिलांच्या 50 मी. रायफल थ्री पोझीशन नेमबाजी प्रकारात भारताच्या आशी चोक्सीने 589 गुणासह 11 वे स्थान, अंजुम मोदगिलने 586 गुणासह 27 वे स्थान, श्रीयांका सदनगीने 582 गुणांसह 53 वे स्थान मिळविले.