महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नवजाताच्या हत्येप्रकरणी ब्रिटिश नर्स दोषी

06:39 AM Jul 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आजारी-कमकुवत नवजातांना केले टार्गेट

Advertisement

वृत्तसंस्था/ लंडन

Advertisement

ब्रिटनमधील नर्स लूसी लेटबीला नवजाताच्या हत्येप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. तिला 5 जुलै रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. लूसीला यापूर्वीच 7 नवजातांच्या हत्येच्या आरोपाप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दोषी आढळलेली नर्स लूसी 33 वर्षाची आहे.

लूसीला आता 2016 मधील एका प्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. हत्या झालेल्या मुलीला बेबी के नाव देण्यात आले आहे. ही मुलगी प्री-मॅच्योर म्हणून जन्माला आली होती आणि तिचे वजन एक किलोपेक्षा कमी होते. लूसीने मुलीच्या श्वसनासाठी लावण्यात आलेल्या ट्यूबचे नुकसान करत बेबी मॉनिटरही बंद केला होता.

रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर रवि जयराम यांनी लूसीला रंगेहात पकडले होते. घटनेवेळी जयराम हे नवजातांच्या वॉर्डमध्ये नियमित तपासणीसाठी पोहोचले होते. लूसी बेबी केच्या बेडनजीक उभी असल्याचे आणि मुलीची ब्रीथिंग ट्यूब हटविण्यात आल्याचे तसेच तिला श्वसनावेळी त्रास होत असल्याचे जयराम यांना दिसून आले हेते. बेबी के हिला उपचारासाठी नंतर  अन्य रुग्णालयात हलविण्यात आले होते, जेथे तिचा मृत्यू झाला होता. लूसीने नवजाताच्या हत्येचा आरोप फेटाळला आहे.

लूसीकडून आजारी किंवा प्री-मॅच्योर म्हणून जन्माला आलेल्या नवजातांची हत्या करण्यात आली होती. तिने या हत्या जून 2015 पासून जून 2016 दरम्यान इंग्लंडच्या काउंटेस ऑफ चेस्टर रुग्णालयात केल्या होत्या. याप्रकरणी नर्स लूसीला जुलै 2018 ते नोव्हेंबर 2020 दरम्यान तीनवेळा अटक करण्यात आली होती. नोव्हेंबर 2020 मध्ये तिच्यावरील आरोप निश्चित झाले होते. लेटबीच्या घरातून पोलिसांना एक हाताने मजकूर लिहिलेला कागद मिळाला होता. लूसीने त्यावर ‘मी दुष्ट आहे, मीच हे केले’ असे लिहिले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article