महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आलिशान जहाज बुडून ब्रिटिश अब्जाधीश बेपत्ता

06:40 AM Aug 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पत्नीसमवेत 14 जणांना वाचविण्यास यश : इटलीच्या किनाऱ्यानजीक दुर्घटना

Advertisement

वृत्तसंस्था/ रोम

Advertisement

इटलीत सिसिली बेटाच्या किनाऱ्यानजीक वादळादरम्यान एक आलिशान जहाज बुडाले आहे. या दुर्घटनेत ब्रिटनचे तंत्रज्ञान उद्योजक माइक लिंच, त्यांचे वकील आणि चार अन्य जण बेपत्ता असल्याची माहिती इटलीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. लिंच यांची पत्नी आणि अन्य 14 जणांना वाचविण्यात आले आहे.

एकूण 6 जण बेपत्ता असून यात लिंच यांचा समावेश आहे. पोर्टिसेलोनजीक आलेल्या वादळादरम्यान लिंच यांचे जहाज बुडाल्याची माहिती सिसिलीच्या नागरी सुरक्षा यंत्रणेचे पदाधिकारी साल्वो कोकिना यांनी दिली आहे. लिंच जून महिन्यात अमेरिकेत एका फसवणुकीच्या मोठ्या खटल्यातून मुक्त झाले होते.

लक्झरी सुपरयॉट वादळामुळे सिसिलीच्या किनाऱ्यानजीक उलटले आणि बुडाले. या जहाजात चालक दलाचे 10 सदस्य आणि 10 प्रवासी होते. यात ब्रिटिश, अमेरिकन आणि कॅनेडियन नागरिक सामील होते. आतापर्यंत एक मृतदेह हस्तगत झाला असून 15 जणांना वाचविण्या आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

56 मीटर लांब ब्रिटिश ध्वज असलेले बायेसियन जहाज स्वत:च्या 75 मीटरच्या मस्तूलसाठी ओळखले जायचे. जहाजाच्या अवशेषांनजीक एक मृतदेह मिळाला आहे, तर 6 जण बेपत्ता आहेत. बचावपथकाने 50 मीटर खोलवर जहाजाच्या अवशेषांना शोधले आहे, असे इटालियन फायर रेस्क्यूचे प्रवक्ते लुका कॅरी यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article