महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कट्टरवादी इस्लामिक धर्मगुरुंवर ब्रिटनकडून बंदी

06:22 AM Mar 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पाकिस्तान-अफगाणिस्तानवर खास नजर : विष ओकणाऱ्यांना राहू देणार नाही

Advertisement

वृत्तसंस्था/ लंडन

Advertisement

ब्रिटनमध्ये वाढत्या कट्टरवादामुळे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी आता कठोर पावले उचलण्याची तयारी केली आहे. याच्या अंतर्गत अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इंडोनेशियाच्या कट्टरवादी इस्लामिक धर्मगुरुंच्या ब्रिटनमधील प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. याकरता व्हिसा वॉर्निंग लिस्ट तयार करण्यात येत आहे.  नव्या योजनेनुसार या यादीत नाव सामील असल्यास संबंधिताला ब्रिटनमध्ये प्रवेश मिळणार नाही. याकरता ऑटोमॅटिक एंट्री बॅन प्रोग्राम तयार करण्यात आला आहे.

इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यापासून ब्रिटनमध्sय पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ अनेक निदर्शने झाली आहेत. यादरम्यान पोलीस-निदर्शकांमध्ये झटापटीचे प्रकार घडले आहेत. तसेच ब्रिटिश खासदारांना जाहीरपणे धमक्या देण्यात आल्या आहेत.

गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानंतर ब्रिटन सरकारने देशात कट्टरवाद्यांच्या कारवाया आणि संख्या धक्कादायक असल्याचे मान्य केले आहे. याचमुळे कट्टरवाद्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच्या अंतर्गत अन्य देशांमधून येणाऱ्या कट्टरवाद्यांच्या प्रवेशाला रोखण्याच्या उपाययोजनंवर विचार केला जात आहे. यानुसार पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इंडोनेशिया यासारख्या देशांमधून येणाऱ्या कट्टरवादी धर्मगुरुंच्या प्रवेशावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयाकरता एक यादी तयार करण्यात आली आहे. यात अनेक प्रकारच्या कट्टरवाद्यांची नावे सामील असतील. संबंधित व्यक्तींनी ब्रिटिश व्हिसासाठी अर्ज करताच त्यांचे नाव कॉम्प्युटर प्रोग्राम पडताळून पाहणार आहे. बंदी यादीत त्याचे नाव सामील असल्यास व्हिसाअर्ज फेटाळला जाणार आहे.

ब्रिटनला तोडण्याचा कट

देशाला विभागणाऱ्या शक्तींच्या विरोधात एकजूट होण्याची वेळ आता आली आहे. आमच्या देशाला तोडण्याचा कट रचला जात असल्याचे पंतप्रधान सुनक यांनी म्हटले होते. ब्रिटनमध्ये शनिवारी देखील पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ हजारो लोकांनी निदर्शने केली होती. यादरम्यान पोलिसांनी 12 जणांना अटक केली होती. जहाल डावे आणि कट्टरवादी गटांनी देशविरोधी शक्तींशी हातमिळवणी केली असून त्यांच्याकडून ब्रिटनसाठी धोका निर्माण करण्याचा कट रचला जात असल्याचे ब्रिटिश सरकारचे सल्लागार लॉर्ड वाल्ने यांनी एका अहवालात नमूद केले आहे.

पोलिसांना पूर्ण मोकळीक

ब्रिटनमध्ये कट्टरवादाला कुठलेच स्थान नाही. अलिकडच्या महिन्यांमध्ये काही लोकांनी हिंसा फैलावण्याचा कट रचला आहे. याचमुळे अशा समाजविरोधी घटकांवर कारवाई करण्यासाठी आम्ही पोलिसांना पूर्ण मोकळीक दिली असल्याचे ब्रिटनच्या गृह मंत्रालयाने एक वक्तव्य जारी करत म्हटले आहे. सुनक आणि गृहमंत्री जेम्स क्लेवरली यानी अलिकडेच देशातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यात ब्रिटनमधील कट्टरवाद्यांची रस्त्यांवरील निदर्शने, खासदारांना धमकीच्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article