लाडकी बहीण योजना घराघरात पोहोचवा - अबीद नाईक
सावंतवाडी | प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली आहे. ही योजना प्रत्येक गावागावात घराघरापर्यंत पोहोचवा. सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले या तिन्ही तालुक्यात एकही लाभार्थी यापासून वंचित राहता कामा नये यासाठी गावागावात अर्ज भरून घेण्यासाठी तसे केंद्र सुरू करा आणि त्या माध्यमातून अधिकाधिक महिलांचे अर्ज दाखल करून घ्या. त्यांना कायमस्वरूपी ही योजना आहे हे पटवून द्या. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले . यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्त्वपूर्ण बैठक आज झाली. यावेळी उदय भोसले ,सुरेश गवस, एम के गावडे ,संदीप राणे ,श्री आणावकर, श्री आर के सावंत ,अशोक पवार, रिया परब आदी उपस्थित होते. यावेळी श्री नाईक यांनी सावंतवाडी शहर व प्रत्येक गावागावात ही योजना प्रभावीपणे राबवा अशा सूचना केल्या. तसेच जिल्हा नियोजन बैठकीत आपल्या भागातील विकास कामे प्रस्तावित ठेवली असून दोन दिवसात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आपण घेणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार ,खासदार नाही त्यामुळे आम्हाला मोठ्या संख्येने निधी द्या असे आम्ही त्यांना सुचित करणार आहोत. आपल्याला गावागावात विकासकामे करायची आहेत आणि आपला पक्ष वाढवायचा आहे असे त्यांनी स्पष्ट केले.