आरक्षण न मिळालेल्या समाजासाठी विधेयक आणून संमत करा
जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांचे आवाहन
न्हावेली / वार्ताहर
सर्व पक्षातील राजकीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन सर्व समाजातील व्यक्तींना आरक्षण देऊन देशाच्या हितासाठी तसेच देशाच्या सीमेवरती भारत देशाचे संरक्षण करण्यासाठी अहोरात्र डोळ्यात तेल घालून या भारतभूमीचे रक्षण करणाऱ्या सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी वेगवेगळ्या समाजामध्ये द्वेषाची भावना होऊ नये म्हणून 50 टक्के वरुन 90 टक्के पर्यंत आरक्षण द्यावे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन हा प्रश्न मार्गी लावावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजेंद्र मसूरकर यांनी केले आहे. सर्व जातींमध्ये लोकांना आरक्षण मिळावे म्हणून वेगवेगळ्या समाजामध्ये द्वेषाची भावना पसरत आहे . यासाठी लोकप्रतिनिधींनी देशाचे ऐक्य राहण्यासाठी आरक्षणाचा मुद्दा लोकसभा व राज्यसभा सभेमध्ये मांडून , राजकारण न करता 50 टक्के वरुन 90% असे आरक्षण द्यावे असे आवाहन केले आहे .