कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

केन विल्यम्सन, रवींद्र यांची शानदार शतके

06:47 AM Feb 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ माऊंट माँगनुई

Advertisement

रविवारी येथे सुरू झालेल्या यजमान न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या क्रिकेट कसोटीत न्यूझीलंडने पहिल्या डावात 2 बाद 258 धावा दिवसअखेर जमविल्या. विल्यम्सनने तसेच रचिन रवींद्रने शानदार शतके झळकवली. या पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी दिली. दक्षिण आफ्रिकेच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर न्यूझीलंडला धावांचा वेग राखणे कठीण जात होते. डावातील दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर दक्षिण आफ्रिकेच्या मॉक्रीने कॉन्वेला पायचीत केले. त्याने एक धाव जमविली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या पॅटर्सनने लॅथमला झेलबाद केले. लॅथमने 48 चेंडूत 4 चौकारांसह 20 धावा जमविल्या. न्यूझीलंडची यावेळी स्थिती 16.5 षटकात 2 बाद 39 अशी होती.

Advertisement

द्विशतकी भागिदारी

केन विल्यम्सन आणि रचिन रवींद्र यांनी संघाचा डाव सावरताना दिवसअखेर तिसऱ्या गड्यासाठी अभेद्य 219 धावांची द्विशतकी भागिदारी केली. विल्यम्सनने 259 चेंडूत 15 चौकारांसह नाबाद 112 तर रचिन रवींद्रने 211 चेंडूत 1 षटकार आणि 13 चौकारांसह नाबाद 118 धावा झळकविल्या. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी उपाहारापर्यंतच्या पहिल्या सत्रात 25 षटकात 65 धावा जमविताना 2 गडी गमविले होते. तर उपाहारानंतर चहापानापर्यंतच्या दुसऱ्या सत्रात न्यूझीलंडने 27 षटकात 60 धावा तसेच खेळाच्या शेवटच्या सत्रात न्यूझीलंडने 34 षटकात 133 धावा जमविल्या. पहिल्या दिवशीचा खेळ जवळपास साडेसहा तास झाला. त्यामध्ये 86 षटके टाकण्यात आली. केन विल्यम्सनचे कसोटीतील हे 30 वे शतक आहे. विल्यम्सनला 47 धावांवर असताना दक्षिण अफ्रिकेच्या मुरेने जीवदान दिले होते. तर रचिन रवींद्रला 80 धावांवर असताना ऑलिव्हरने सोपा झेल सोडला होता. कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज विल्यम्सनने आपला दर्जा पुन्हा एकदा सिद्ध केला. पहिल्या दिवसाच्या खेळातील शेवटच्या सत्रात विल्यमसनने आपले शतक चौकार ठोकून पूर्ण केले. विल्यमसनने हे शतक 241 चेंडूत झळकवले. दक्षिण आफ्रिका विरुद्धचे त्याचे हे चौथे शतक आहे तसेच न्यूझीलंडमधील त्याचे हे 17 वे शतक नोंदविले गेले आहे. तीन वर्षापूर्वी कसोटी पर्दापण करणाऱ्या रचिन रविंद्रने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या शिस्तबद्ध गोलंदाजीला चोख प्रत्युत्तर दिले. त्याने आपल्या शतकी खेळात 1 षटकार आणि 13 चौकार ठोकले आहेत. विल्यमसनने आपले अर्धशतक 144 चेंडूत तर रचिन रवींद्रने आपले अर्धशतक 120 चेंडूत झळकविले. विल्यमसनने आपल्या नेहमीच्या पुलच्या फटक्यावर चौकार नोंदवित शतक पूर्ण केले. मात्र 99 धावांवर रवींद्रला बराच वेळ रहावे लागले होते. न्यूझीलंडच्या या दोन्ही शतकवीरांना दक्षिण आफ्रिकेकडून जीवदाने मिळाल्याने त्यांची स्थिती समाधानकारक राहिली आहे. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी द्विशतकी भागिदारी 387 चेंडूत झळकवली. दक्षिण अफ्रिकेतर्फे मोरेकी आणि पॅटर्सन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक - न्यूझीलंड प. डाव 86 षटकात 2 बाद 258 (विल्यम्सन खेळत आहे 112, रचिन रवींद्र खेळत आहे 118, लॅथम 20, कॉन्वे 1, अवांतर 7, मोरेकी 1-81, पॅटर्सन 1-59).

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#cricket#social media
Next Article