For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ईश्वरन, सॅमसन यांची शानदार शतके

06:18 AM Sep 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
ईश्वरन  सॅमसन यांची शानदार शतके
Advertisement

वृत्तसंस्था / अनंतपूर

Advertisement

2024 च्या दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेतील राऊंड रॉबीन लीग पद्धतीच्या अंतिम सामन्यात शुक्रवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाखेर इंडिया ब संघाने पहिल्या डावात 6 बाद 210 धावा जमविल्या. तत्पूर्वी इंडिया ड चा पहिला डाव 349 धावांत आटोपला. इंडिया ड तर्फे संजू सॅमसनने तर इंडिया ब तर्फे ईश्वरनने शतके झळकविली. मात्र सुर्यकुमारकडून साफ निराशा झाली.

या सामन्यात इंडिया ड संघाने 5 बाद 306 या धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्यांचा डाव 87.3 षटकात 349 धावांत आटोपला. इंडिया ड चे 5 फलंदाज 43 धावांत बाद झाले. इंडिया ड च्या डावामध्ये संजू सॅमसनने शानदार शतक झळकविले. त्याने 101 चेंडूत 3 षटकार आणि 12 चौकारांसह 106 धावांचे योगदान दिले. इंडिया ब च्या नऊदीप सेनीने 74 धावांत 5 गडी बाद केले.

Advertisement

त्यानंतर इंडिया ब च्या डावामध्ये अभिमन्यु ईश्वरनने 116 धावांची खेळी केली. प्रथमश्रेणी क्रिकेटमधील त्याचे हे 25 वे शतक आहे. मात्र सुर्यकुमार यादव केवळ 5 धावांवर बाद झाला. इंडिया ब ची एकवेळ स्थिती 2 बाद 88 अशी होती. त्यानंतर अर्शदीप सिंगने मुशिरखानला 5 धावांवर तर सुर्यकुमार यादला 5 धावांवर बाद केले. अर्शदीपने अष्टपैलु नितीश रे•ाrला खाते उघडण्यापूर्वीच झेल बाद केल्याने इंडिया बची स्थिती 5 बाद 100 अशी झाली होती. त्यानंतर ईश्वरन आणि वॉशिंग्टनसुंदर यांनी सहाव्या गड्यासाठी 105 धावांची भागिदारी केली. वॉशिंग्टनसुंदर 39 धावांवर खेळत आहे. इंडिया ड तर्फे अर्शदीप सिंगने 30 धावांत 3 गडी बाद केले. या सामन्यात इंडिया ड चा संघ अद्याप 139 धावांनी आघाडीवर आहे.

संक्षिप्त धावफलक : इंडिया ड प. डाव 87.3 षटकात सर्वबाद 349 (संजू सॅमसन 106, सैनी 5-74), इंडिया ब प. डाव 56 षटकात 6 बाद 210 (अभिमन्यु ईश्वरन 116, वॉशिंग्टन सुंदर खेळत आहे 39, अर्शदीप सिंग 3-30)

Advertisement
Tags :

.