For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बृजभूषण सिंह यांच्या अडचणीत वाढ

06:41 AM May 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
बृजभूषण सिंह यांच्या अडचणीत वाढ
Advertisement

न्यायालयाने आरोप निश्चित करण्याचा दिला आदेश : महिला कुस्तीपटूंच्या शोषणाचा आरोप

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख आणि भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. दिल्लीच्या राउज अॅव्हेन्यू न्यायालयाने बृजभूषण सिंह विरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला आहे. बृजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. 6 पैकी 5 प्रकरणांमध्ये बृजभूषण विरोधात आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

Advertisement

5 प्रकरणांमध्ये भादंविचे कलम 354 आणि 354 ड अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले आहेत. तर त्यांच्या विरोधातील सहावे प्रकरण फेटाळण्यात आले आहे. भादंविचे कलम 354 अंतर्गत दोषी ठरल्यास किमान एक वर्षाची शिक्षा सुनावली जाऊ शकते. तसेच शिक्षेचा हा कालावधी 5 वर्षांपर्यंत वाढविला जाऊ शकतो. तर संबंधित प्रकरणातील आणखी एक आरोपी विनोद तोमर विरोधात भादंविचे कलम 506 अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आला आहे.

बृजभूषण यांच्या विरोधात 6 कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यांच्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी खासदाराच्या विरोधात एफआयआर नोंदविला होता. 15 जून 2023 रोजी पोलिसांनी बृजभूषण यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. बृजभूषण यांच्यावर एका अल्पवयीन कुस्तीपटूने देखील आरोप केले होते. परंतु पुढील काळात तिने स्वत:ची तक्रार मागे घेतली होती. तर दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी पॉक्सो अंतर्गत क्लोजर अहवाल दाखल केला होता.

Advertisement
Tags :

.