For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय कुस्ती महासंघावर ब्रिजभूषण यांचे वर्चस्व कायम

07:00 AM Dec 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
भारतीय कुस्ती महासंघावर ब्रिजभूषण यांचे वर्चस्व कायम
Advertisement

निकटवर्तीय संजय सिंह यांची अध्यक्षपदी निवड

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या (डब्ल्यूएफआय) अध्यक्षपदी निवड झाली आहे. कॉमनवेल्थ गेम्सची सुवर्णपदक विजेती अनिता शेओरान यांच्याशी संजय सिंह यांची लढत होती. या अध्यक्षपद निवडीमध्ये आंदोलक कुस्तीगीरांचा शेओरान यांना पाठिंबा होता. आता संजय सिंह यांनी अध्यक्षपदी बाजी मारल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. आम्हाला न्याय मिळाला नाही, असा दावा करत दिग्गज कुस्तीपटू साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी संजय सिंह यांच्या निवडीचा निषेध करत साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली.

Advertisement

संजय सिंह यांच्या विजयानंतर ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या निवासस्थानी फटाके फोडण्यास सुऊवात झाली. आमचे संपूर्ण पॅनल विजयी झाल्याचे ब्रिजभूषण सिंह यांचे जावई विशाल सिंह यांनी निकालानंतर सांगितले. निवडणूक जिंकल्यानंतर संजय सिंह यांनी समाधान व्यक्त केले. तसेच आता कुस्तीसाठी राष्ट्रीय शिबिरे आयोजित केली जातील. ज्या कुस्तीपटूंना राजकारण करायचे आहे ते राजकारण करू शकतात, ज्यांना कुस्तीमध्ये प्राविण्य मिळवायचे आहे ते कुस्ती खेळतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

मूळचे वाराणसीचे असलेले संजय सिंह हे ब्रिजभूषण यांचे निकटवर्तीय मानले जातात. दोघेही जवळचे मित्र मानले जातात.  संजय सिंह यांचे शिक्षण काशी हिंदू विद्यापीठात झाले. संजय लहानपणापासून कुस्तीशी जोडले गेले होते. त्यांचे आजोबा कन्हैया सिंह हे दर महाशिवरात्रीला बनारसमध्ये कुस्तीचे मोठे आयोजन करायचे. त्यांच्या कुटुंबात अनेक कुस्तीपटू जन्माला आले, त्यात मंगला राय यांचाही समावेश आहे. संजय सिंह 2008 मध्ये वाराणसी कुस्तीगीर संघटनेचे जिल्हाध्यक्ष बनले. 2009 मध्ये जेव्हा उत्तर प्रदेश कुस्ती संघाची स्थापना झाली तेव्हा ब्रिजभूषण शरण सिंह प्रदेशाध्यक्ष आणि संजय सिंग उपाध्यक्ष झाले होते. डब्ल्यूएफआयच्या निवडणुकीची प्रक्रिया जुलैमध्येच सुरू झाली होती, परंतु प्रकरण न्यायालयात गेल्याने त्यास विलंब झाला. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने घातलेल्या निवडणुकीवरील बंदी नाकारल्यामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला होता.

Advertisement
Tags :

.