महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सावंतवाडीत उद्या भंडारी समाजाचा वधू - वर मेळावा

10:55 AM Jan 06, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाचा वधू - वर मेळावा रविवार ७ जानेवारी रोजी आरपीडी हायस्कूल सावंतवाडीच्या नवरंग सभागृहामध्ये सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. रविवारी सकाळी १० वाजता मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थनी गोव्याचे आमदार जीत आरोलकर हे आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, अखिल भारतीय भंडारी मंडळाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर, भंडारी समाज मंडळ अध्यक्ष रमण वायंगणकर, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजू कीर, माजी आमदार शंकर कांबळी , जिल्हा बँक संचालक महेश सारंग उपस्थित राहणार आहेत. यावेळी महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्रा. सुषमा मांजरेकर व जिल्हा नियोजन समिती व जिल्हा बँक संचलक पदी निवड झाल्याबद्दल महेश सारंग यांचा सत्कार यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. उद्घाटन कार्यक्रमानंतर प्रत्यक्ष वधू वर कार्यक्रम होणार आहे. आतापर्यंत ३०० हून अधिक ज्ञाती बांधवांनी वधू वर नोंदणी केली आहे. मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रभारी अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
# tarun Bharat news update #
Next Article