ब्रेव्हिस, मार्करम यांचे लिलावाचे नवे विक्रम
वृत्तसंस्था / जोहान्सबर्ग
द. आफ्रिकेचे फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिस आणि एडन मार्करम यांनी एसए-20 सीझन 4 च्या खेळाडूंच्या लिलावात विक्रमी रक्कम मिळवली. जे लीगच्या इतिहासातील सर्वात महागडे खरेदीदार ठरले.
ब्रेव्हिसला सौरव गांगुली प्रशिक्षक असलेल्या प्रिटोरिया कॅपिटल्सने आर 16.5 दशलक्ष (अंदाजे 8.3 कोटी रुपये) मध्ये विकत घेत 2022 मध्ये ट्रिस्टन स्टब्जसाठी आर 9.2 दशलक्ष (अंदाजे 4.6 कोटी रुपये) चा विक्रम मागे टाकला. सेंच्युरियनस्थित फ्रँचायझीने नवीन मुख्य प्रशिक्षक गांगुलीच्या नेतृत्वाखाली जोबर्ग सुपर किंग्जच्या कडक स्पर्धेला मागे टाकत 22 वर्षीय खेळाडूला मिळवले.
मला आशा आहे की तो चांगली कामगिरी करेल. मला वाटते की तो एक जबरदस्त प्रतिभा आहे. गेल्या दीड वर्षात त्याच्या खेळात खरोख्घ्रच प्रगती झाली आहे. जसे की आम्ही ऑस्टेलियाविरुद्ध पाहिले, गांगुलीने मंगळवारी लिलावानंतर एका प्रसिद्धीपक्षकात म्हटले. त्या दौऱ्यात त्याने दाखवून दिले की तो एक गेमचेंजर आहे आणि टी-20 क्रिकेटमध्ये तुम्हाला नेमके हेच हवे आहे. आमच्याकडे रसेल, रुदरफोर्ड आहेत आणि मला आशा आहे की ब्रेव्हिसही तेच करेल. मी कधीही कामगिरीला पैशाशी जोडत नाही. 16.5 दशलक्ष रुपये सोडले तर मला वाटते की तो एक उत्तम प्रतिभा आहे. तो फिरकी खूप चांगली खेळतो. जे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि सर्वकाही विचारात घेतल्यामुळेच तो त्या किमतीला गेला.
सनरायझर्स ईस्टर्न केपने आर 12.4 दशलक्षना राईट टू मॅच कार्डसह त्याला कायम ठेवण्याचा प्रयत्न केल्यानंतर द. आफ्रिकेचा टी-20 कर्णधार मार्करम, डर्बनच्या सुपर जायंट्सकडे आर 14 दशलक्ष (अंदाजे 7 कोटी रुपये) गेला. मी नेहमीच आकडेवारीबद्दल बोलण्यास नाखूष असतो. परंतु द. आफ्रिकन क्रिकेटमध्ये गुंतवणूक परत पाहणे रोमांचक आहे, असे एसए20 लीग कमिशर ग्रॅमी स्मिथ लिलावानंतर म्हणाले.
एकूणच सहा फ्रँचायझींनी 84 खेळाडूंवर आर 129.3 दशलक्ष (अंदाजे 65 कोटी रुपये) खर्च केले ज्यामध्ये द. आफ्रिकेतील आर 116.9 दशलक्ष (अंदाजे 59 कोटी रुपये) समाविष्ट आहेत. एकूण 22.8 दशलक्ष (अंदाजे 11.4 कोटी रुपये) बारा अंडर-23 खेळाडूंमध्ये गुंतवले गेले. तरुणांमध्ये किशोरवयीन वेगवान गोलंदाज क्वेना माफाकाला डर्बनच्या सुपर जायंट्सने आर 2.2 दशलक्षमध्ये निवडले तर जानको स्मित (जोबर्ग सुपर किंग्ज), बायंडा माजोला (प्रिटोरिया कॅपिटल्स) आणि जेजे बेसन (पार्ल रॉयल्स) यांनीही त्यांच्या पदार्पणाच्या एसए-20 हंगामांसाठी करार मिळवले. जोबर्ग सुपर किंग्जने अष्टपैलु वियान मुल्डरला 9 दशलक्ष (अंदाजे 4.5 कोटी रुपये) आणि डावखुरा वेगवान गोलंदाज नांद्रे बर्गरला 6.3 दशलक्षना (अंदाजे 3.1 कोटी रुपये) करारबद्ध केले. एसए-20 चा चौथा हंगाम 26 डिसेंबर ते 25 जानेवारी 2026 दरम्यान सुरू होईल.