For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोन तास श्वास रोखणारा जीव

06:23 AM Feb 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
दोन तास श्वास रोखणारा जीव
Advertisement

मगर या प्राण्यासंबंधी आपल्यापैकी बहुतेकांना बरीचशी माहिती आहे. हा पाण्यात राहणारा पण भूमीवरही हालचाल करु शकणारा भूजलचर प्राणी आहे. तो अत्यंत क्रूर पद्धतीने शिकार करतो. त्याचे रुप भीतीदायक असते. दात तर अत्यंत विक्राळ असतात. त्याच्या जबड्यात प्रचंड शक्ती असते. कोणतीही कठीण आणि जाड वस्तू त्याच्या जबड्यात सापडली तर ती सुटू शकत नाही. हत्तीचा पाय जबड्यात पकडून त्याला पाण्यात खेचण्याची त्याची क्षमता असते, इत्यादी माहिती आपल्याला असते. पण ती सर्वसामान्य माहिती झाली. मगर या प्राण्याची अनेक वैशिष्ट्यो आजही अज्ञात असून ती शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Advertisement

या प्राण्याचे महत्वाचे वैशिष्ट्या असे की तो पाण्याखाली 2 तासपर्यंत श्वास रोखून राहू शकतो. हे वैशिष्ट्या बराच काळ ज्ञात नव्हते. तो दर पाच ते सहा मिनिटांनी पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन श्वास घेतो अशी समजूत होती. ती खरीही आहे. कारण सर्वसामान्य स्थितीत आणि मगरीला कोणताही बाह्या धोका जाणवला नाही, तर तो प्राणी ठराविक वेळानंतर नाक पाण्याच्या पृष्ठभागाच्या वर काढून श्वास घेतो. पण आणीबाणीच्या परिस्थितीत तो जवळपास दोन तास आपला श्वास रोखून धरुन पाण्यातच राहू शकतो. विशेषत: खाऱ्या पाण्याच्या स्रोतांमध्ये राहणाऱ्या मगरीची श्वास रोखून धरण्याची क्षमता गोड्या पाण्यातील मगरीच्या क्षमतेपेक्षा अधिक असते. या क्षमतेमुळे त्याच्या भक्ष्याला त्याच्या पाण्यातील अस्तित्वाचा कित्येकदा सुगावा लागत नाही. त्यामुळे शिकार करणे त्याच्यासाठी सोपे होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.