For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इराण राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरचे हार्ड लँडिंग

06:48 AM May 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
इराण राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरचे हार्ड लँडिंग
Advertisement

अझरबैजानहून परतताना घटना : सर्वजण सुखरूप असल्याचा दावा

Advertisement

वृत्तसंस्था/ तेहरान

इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रायसी यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे रविवारी हार्ड लँडिंग करावे लागले. अझरबैजानहून इराणला परतत असताना ही घटना घडली असून इब्राहिम रायसी यांच्यासह हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र हेलिकॉप्टरच्या लँडिंगमध्ये अडचण का आली याचे कारण स्पष्ट झाले नसल्याचे इराणी मीडिया ‘आयआरएनए’ने म्हटले आहे.

Advertisement

अझरबैजानची सीमा असलेल्या इराणच्या जोल्फा शहरात हेलिकॉप्टरच्या हार्ड लँडिंगची घटना घडली आहे. खराब हवामानामुळे इराणी रेड व्रेसेंट सोसायटीच्या बचाव पथकांना घटना घडलेल्या भागात पोहोचणे कठीण झाल्याचे वृत्त प्रेस टीव्हीने दिले आहे. या कारवाईत मदत करण्यासाठी ड्रोनही पाठवण्यात आले आहेत.

इब्राहिम रायसी हे 19 मे रोजी सकाळी अझरबैजानचे राष्ट्रपती इल्हाम अलीयेव यांच्यासमवेत धरणाचे उद्घाटन अझरबैजानमध्ये पोहोचले होते. दोन्ही देशांनी मिळून बांधलेले आरस नदीवर बांधलेले हे तिसरे धरण आहे. या धरणाचे उद्घाटन करून परतत असताना इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या हेलिकॉप्टरला हार्ड लँडिंग करावे लागले.  त्यांच्या ताफ्यात तीन हेलिकॉप्टर होती. त्यापैकी दोन हेलिकॉप्टर मंत्री आणि अधिकाऱ्यांना घेऊन जात होते.

Advertisement
Tags :

.