For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावळीत तलावाचा बांध फोडून मुरुमाची चोरी

05:36 PM Jun 05, 2025 IST | Radhika Patil
सावळीत तलावाचा बांध फोडून मुरुमाची चोरी
Advertisement

कुपवाड :

Advertisement

मिरज तालुक्यातील सावळी येथील सार्वजनिक स्मशानभूमी जवळच्या गायरान जमीनीवरील गाव तलावातून अज्ञाताकडून मुरुमाची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संशयिताने तलावातील मध्यभाग तसेच तलावाचा संरक्षण कडा असलेला बांध फोडून तब्बल १६४ ब्रास इतका मुरूम साठा लंपास केला आहे. याबाबत सावळी गावात खळबळ उडाली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबतचा लेखी अहवाल सावळी ग्रामपंचायतने मिरज पंचायत समिती गटविकास अधिकारी यांचेकडे पाठविला आहे. याप्रश्री तहसीलदार व पंचायत समिती प्रशासनाने लक्ष घालून लवकरच फौजदारी दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

सावळी परिसरात सार्वजनिक स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीजवळ गायरान जमीन असून या जमिनीवर काही वर्षांपूर्वी गट नंबर १७६ मध्ये गाव तलाव तयार झाला आहे. अज्ञात चोरट्यानी मिळून काही दिवसापूर्वी तलावाच्या मध्यभागातील ५९.२८ ब्रास व तलावाच्या तिन्ही बाजूकडील संरक्षणकडा असलेला बांध फोडून बांधावरील १०४.७२ ब्रास असे एकूण १६४ ब्रास मुरुमाची चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत कुबेर गणे, नायकु पवार, दिनकर पवार, मनोज कांबळे, अनिल लोंढे यांनी मिरज तहसिलदार व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचेकडे तक्रार केली आहे. याची दखल घेऊन तहसिलदार यांनी मंडल अधिकारी व तलाठी तसेच गटविकास अधिकारी यांनी पंचनामा करून अहवाल देण्यचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मंडल अधिकारी व तलाठी यांनी पंचनामा करून तहसिलदार यांचेकडे तर ग्रामसेवक व सरपंच यांनी गटविकास अधिकारी यांचेकडे अहवाल सादर केला आहे. आता याप्रकरणी पुढील कारवाई होईल, अशी सावळीकरांची अपेक्षा आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.