For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Breaking : लोकसभेसाठी ठाकरे गटाची पहीली यादी जाहीर; सांगलीत काँग्रेसला झटका

12:02 PM Mar 27, 2024 IST | Abhijeet Khandekar
breaking   लोकसभेसाठी ठाकरे गटाची पहीली यादी जाहीर  सांगलीत काँग्रेसला झटका
Advertisement

शिवसेनेने (उद्धव बाऴासाहेब ठाकरे) पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या 16 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून त्यात माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि अरविंद सावंत यांच्यासह राज्याचे लक्ष लागून राहीलेल्या सांगली लोकसभेच्या जागेवर पैलवान चंद्रहार पाटील यांची यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेनेने जाहीर केलेल्या यादीमुळे काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला असल्याचं दिसून येत आहे.

Advertisement

गेल्या काही महीन्यांपासून महाविकास आघाडी अंतर्गत जागा वाटपावर बरिच खलबते चालु होती. त्यातच वंचित बहूजन आघाडीचा मुद्दाही अजेंड्यावर होता. त्यामुळे जागावाटपावर कोणाला किती जागा जाणार आणि कोणासाठी कुठला मतदारसंघ सोडला जाणार हे गुलदस्त्यात होते. गेल्या दोन दिवसांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार आणि काँग्रेसमध्ये जोरदार चर्चा झाल्यावर आज अखेर शिवसेनेने आपल्या लोकसभेच्या निवडणुकिसाठी पहीली यादी जाहीर केली.

शिवसेनेने आज काँग्रेसला धक्का देताना सांगली लोकसभेसाठी अपेक्षेप्रमाणे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली. त्यांच्या या नावाने विशाल पाटील गटाला सांगलीमध्ये मोठा झटका बसला आहे.

Advertisement

Image

त्याच बरोबर शिवसेनेने आपल्या अनेक एकनिष्ठ कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली आहे. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, अरविंद सावंत, विनायक राऊत, अनिल देसाई यांच्या नावांचा समावेश आहे. या प्रमुख नेत्यांना अनुक्रमे रायगड, सिंधुदुर्ग- रत्नागिरी, मुंबई- दक्षिण, मुंब- दक्षिण मध्य या मतदारसंघाचा समावेश आहे.

याशिवाय, पक्षाने ठाण्यातून राजन विचारे, मुंबई उत्तर-पश्चिममधून अमोल कीर्तिकर आणि मुंबई उत्तर-पूर्वसाठी संजय पाटील यांना उमेदवारी दिली आहे. याच बरोबर ठाणे, परभणी, बुलढाणा, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, शिर्डी या लोकसभेच्या जाग्यावरूनही आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

Advertisement
Tags :

.