कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मोठी बातमी! गुजरातमध्ये प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं!

02:42 PM Jun 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना घडली. अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात  प्रवासी विमान कोसळलं असून रहिवासी परिसरात विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. हे विमान असल्याचे समजते. घटनेनंतर काही क्षणातच तीन अग्निशमन गाड्या तात्काळ घटनास्थळी रवाना झाल्या असून, बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. सध्या या विमानात किती प्रवासी होते याची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र, या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील या विमानातून प्रवास करत होते, अशी प्राथमिक माहिती आहे. विमान अपघाताच्या कारणांबाबतही अद्याप स्पष्टता नाही. प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गुजरातमधील अहमदाबाद इथे एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला असून मेघानीनगर ह्या नागरी वस्तीतच हे विमान कोसळलं. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी व प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून विमानातून तब्बल 133 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. विमान जिथे क्रॅश झालं, त्याठिकाणी धुराचे मोठे लोळ पसरल्याचं दिसून येत आहे, घटनास्थळी बचाव पथक पोहोचलं आहे. मात्र, या दुर्घटनेत मोठी जिवितहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Advertisement

https://www.tarunbharat.com/wp-content/uploads/2025/06/x-downloader.com_7AHpMu.mp4
Advertisement
Advertisement
Tags :
#brekingnews#planecrash#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article