Breaking : इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; शुभमन गिलची कर्णधारपदी निवड,ऋषभ पंत उपकर्णधार
भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे, जिथे त्यांना यजमान संघाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ आणि नवीन कसोटी कर्णधाराची घोषणा करण्यात आली आहे. संघाची धुरा शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे, तर ऋषभ पंतला उपकर्णधार बनवण्यात आले हे. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या साई सुदर्शन आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांना पहिल्यांदाच कसोटी संघात स्थान मिळाले आहे. बऱ्याच काळानंतर पुनरागमन करणाऱ्या करुण नायरचीही संघात निवड झाली आहे. काही दिवसांपूर्वीच रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर या दोघांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाला खेळावे लागणार आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ
शुभमन गिल, कर्णधार
ऋषभ पंत- उपकर्णधार-यष्टीरक्षक
यशस्वी जयस्वाल-फलंदाज
करुण नायर-फलंदाज
रवींद्र जाडेजा-अष्टपैलू
वॉशिंग्टन सुंदर-अष्टपैलू
शार्दुल ठाकूर-अष्टपैलू
जसप्रीत बुमराह-गोलंदाज
मोहम्मद सिराज-गोलंदाज
आकाश दीप-गोलंदाज
कुलदीप यादव-गोलंदाज
के एल राहुल-फलंदाज
साई सुदर्शन-फलंदाज
अभिमन्यू ईश्वरन-फलंदाज
ध्रुव जुरेल-यष्टीरक्षक-फलंदाज
प्रसिद्ध कृष्णा-गोलंदाज
अर्शदीप सिंग-गोलंदाज
नितीश कुमार रेड्डी -अष्टपैलू
भारतीय संघाचा इंग्लंड दौरा
- पहिली कसोटी: 20-24 जून 2025 - हेडिंग्ले, लीड्स
- दुसरी कसोटी: 2-6 जुलै 2025 - एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
- तिसरी कसोटी: 10-14 जुलै 2025 - लॉर्ड्स, लंडन
- चौथी कसोटी: 23-27 जुलै 2025 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
- पाचवी कसोटी: 31 जुलै-4 ऑगस्ट 2025 - द ओव्हल, लंडन