महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

ब्रेकिंग| शिवसेना कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख विजय देवणे यांच्यावर गुन्हा दाखल

11:49 PM Dec 04, 2023 IST | Rohit Salunke
Advertisement

आज बेळगाव सीमाबांधवांनी महाराष्ट्र हद्दीतील शिनोळी परिसरात येऊन रास्ता रोको आंदोलन केल्या प्रकरणी कोल्हापुरातील चंदगड पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले असून  कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख विजय देवणेसह इतर ४० जणांवर गुन्हा दाखल. यामध्ये बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितींच्या कार्यकर्त्यांचाही समावेश आहे.आज सोमवार दि ४ डिसेंबर रोजी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर म ए समिती व शिवसेनेकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र सरकार विरुद्धही घोषणा दिल्या गेल्या.मराठी भाषिक सिमावासियांवर कर्नाटकात पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्याची मालिका सुरु असतानाच आता महाराष्ट्र पोलीसांनीही गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केल्याने सीमाभागात प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Next Article