For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ब्रेकिंग| शिवसेना कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख विजय देवणे यांच्यावर गुन्हा दाखल

11:49 PM Dec 04, 2023 IST | Rohit Salunke
ब्रेकिंग  शिवसेना कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख विजय देवणे यांच्यावर गुन्हा दाखल
Advertisement

आज बेळगाव सीमाबांधवांनी महाराष्ट्र हद्दीतील शिनोळी परिसरात येऊन रास्ता रोको आंदोलन केल्या प्रकरणी कोल्हापुरातील चंदगड पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले असून कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख विजय देवणेसह इतर ४० जणांवर गुन्हा दाखल. यामध्ये बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितींच्या कार्यकर्त्यांचाही समावेश आहे.आज सोमवार दि ४ डिसेंबर रोजी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर म ए समिती व शिवसेनेकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र सरकार विरुद्धही घोषणा दिल्या गेल्या.मराठी भाषिक सिमावासियांवर कर्नाटकात पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्याची मालिका सुरु असतानाच आता महाराष्ट्र पोलीसांनीही गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केल्याने सीमाभागात प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement

.