हद्दपार आदेशांचा भंग ; रेकॉर्डवरील चार गुन्हेगार अटकेत
कोल्हापूर प्रतिनिधी
जिह्यातून हद्दपार केलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारापैकी चार गुन्हेगारांनी हद्दपार आदेशाचा भंग कऊन जिह्यात प्रवेश केला. त्या चार गुन्हेगारांना पोलिसांनी पकडून अटक केली. निरंजन वसंत ढोबळे (वय 36), कुलदीप बाजीराव लांबोरे (वय 40, दोगे रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर), उमेश उर्फ गोय्या बबन विटेकर (वय 30, रा. कनाननगर, कोल्हापूर), श्रीकांत शिवाजी दाभाडे (वय 30, रा. साखरवाडी, कोडोली, ता. पन्हाळा) अशी त्यांची नावे आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाकेच्या पोलिसांनी केली.
पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि त्यांची गुन्हेगारी टोळीचे गुन्हेगारीचे कारनामे पाहून, त्या गुन्हेगारी टोळीच्या प्रमुखासह टोळीतील गुन्हेगारांना वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि प्रांताधिकाऱ्यांच्याकडून जिह्यातून हद्दपार केले आहे. असे हद्दपार झालेल्यामध्ये जिह्यातील काही नामचिन गुन्हेगारी टोळ्याच्या म्होरक्यासह त्यांच्या साथिदारांचा समावेश आहे. गणेशोत्सवामध्ये जिह्यातून हद्दपार झालेल्यापैकी काही गुन्हेगारांनी हद्दपार आदेश धाब्यावर बसवून अवैधपणे जिह्यात प्रवेश केला. ही गंभीर बाब स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या निदर्शनास आली. त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी हद्दपार आदेश भंग कऊन, शहरासह जिह्यात वारवरत असलेल्या गुन्हेगाराचा शोध सुऊ केला. यावेळी त्यांना शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगार निरंजन ढोबळे, कुलदीप लांबोरे या दोघांना तर शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून उमेश उर्फ गोट्या विटेकर आणि कोडोली (ता. पन्हाळा) पोलीस ठाण्याच्या हद्दीतून श्रीकांत दाभाडे या चौघांना अटक केली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांच्याकडून हद्दपार आदेशाचा भंग कऊन, जिह्यात प्रवेश केलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराविरोधी कारवाई केली जात आहे. पण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाकडून अशी कारवाई करण्याकडे का दुर्लक्ष केले जात आहे, अशी विचारणा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याकडून पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांच्याकडे होवू लागली आहे.