महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

ब्राझीलचा पॅराग्वेवर 4-1 ने विजय

06:37 AM Jun 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कॉस्टा रिकाला 3-0 ने नमवून कोलंबियाचा संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल

Advertisement

वृत्तसंस्था/ लास व्हेगास

Advertisement

व्हिनिसियस ज्युनियरने पहिल्या सत्रामध्ये केलेल्या दोन गोलांच्या जोरावर ब्राझीलने कोपा अमेरिकामध्ये पॅराग्वेवर 4-1 असा विजय मिळवला आणि ‘ड’ गटातून पुढील फेरीतील आपला प्रवेश पक्का केला. साविन्होनेही ब्राझीलसाठी पहिल्या सत्रामध्ये गोल केला, तर दुसऱ्या सत्रात लुकास पक्वेटाने पेनल्टी किकवर गोलाची नोंद केली. पॅराग्वेचा गोल ओमर अल्देरेटने केला.

पाच पिवळी कार्डे आणि एक रेड कार्ड दाखविल्या गेलेल्या या सामन्यात बरेच तणावाचे क्षण राहिले. अँड्रेस क्युबासला 81 व्या मिनिटाला लाल कार्ड देऊन बाहेर पाठवण्यात आले, ज्यामुळे पॅराग्वेला सामन्याचा शेवटचा भाग दहा खेळाडूंनिशी खेळणे भाग पाडले. ब्राझीलच्या वेंडेल, ज्युनियर आणि पॅक्वेटा, तर पॅराग्वेच्या फॅबियन बाल्बुएना आणि हर्नेस्टो कॅबलेरो यांना पिवळे कार्ड दाखविण्यात आले.

चार गुणांसह ब्राझील गटात आघाडीवर असलेल्या कोलंबियाहून दोन गुणांनी मागे आहे. मंगळवारी कोलंबियाविऊद्ध ब्राझीलचा सामना होणार असून त्यात विजय किंवा बरोबरी मिळाल्यास ब्राझील या गटातून बाद फेरीतील दोनपैकी एक स्थान निश्चित करेल. ब्राझीलचा गोलफरक कॉस्टा रिकापेक्षा चांगला असून त्यामुळे पराभव जरी झाला, तरी नऊ वेळा कोपा अमेरिकाचा विजेता राहिलेला हा संघ स्पर्धेबाहेर पडण्याची शक्यता नाही. पॅराग्वे मात्र पुढील फेरीत जाणार नाही.

दुसरीकडे, डेव्हिन्सन सांचेझ आणि जॉन कॉर्डोबा यांनी उत्तरार्धात तीन मिनिटांच्या अंतराने गोल केले आणि त्याच्या जोरावर कोलंबियाने कॉस्टा रिकावर 3-0 असा विजय मिळवून कोपा अमेरिका स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सलग दुसऱ्या सामन्यात कोलंबियाने चेंडूवर ताबा ठेवण्याच्या बाबतीत वर्चस्व गाजविले (62 टक्के) आणि 31 व्या मिनिटाला लुईस डायझच्या पेनल्टी किकवर 1-0 ने आघाडी घेतली. कोलंबियाने उत्तरार्धातही दबाव कायम ठेवला आणि स्टेट फार्म स्टेडियमवरील 27,386 चाहत्यांसमोर वर्चस्वपूर्ण कामगिरी केली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article