For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव रेल्वे स्टेशन येथे म.ए. समितीच्यावतीने आंबेडकर जयंती साजरी

02:23 PM Apr 14, 2024 IST | Rohit Salunke
बेळगाव रेल्वे स्टेशन येथे म ए  समितीच्यावतीने आंबेडकर जयंती साजरी
Advertisement

Advertisement

शिव-भीम शक्तीच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

बेळगाव:भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती उत्सव महाराष्ट्र एकीकरण समिती व दलित संघटनेच्यावतीने बेळगाव रेल्वे स्थानकात साजरी करण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर, लोकसभा निवडणुकीचे उमेदवार महादेव पाटील व मान्यवरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिल्प कलाकृतीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केला. याप्रसंगी जय भवानी - जय शिवराय, जय भीमरायच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला. याप्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रमुख मदन बामणे, रणजित चव्हाण पाटील, सागर पाटील, दलित नेते कल्लाप्पा मेत्री यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समिती व दलित संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.