For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Miraj : ब्रेक फेल...विद्यार्थ्यांचे व्हॅन थेट कॅनॉलमध्ये!

05:41 PM Nov 17, 2025 IST | NEETA POTDAR
miraj   ब्रेक फेल   विद्यार्थ्यांचे व्हॅन थेट कॅनॉलमध्ये
Advertisement

                 मिरजेत ब्रेक फेलचा थरार! स्कूल व्हॅन थेट कॅनॉलमध्ये

Advertisement

सांगली : मिरज-बेळंकी मार्गावर आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. शिपूर येथील शाळा वाहन अचानक कॅनॉलमध्ये कोसळल्याने क्षणभर घबराट पसरली. मिळालेल्या माहितीनुसार, शिपूरहून बेळंकीकडे विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या या गाडीसमोर अचानक एक वाहन आले. त्यामुळे चालकाचा ताबा सुटला, त्यातच ब्रेक फेल झाल्याने संपूर्ण वाहन थेट कॅनॉलमध्ये घसरले.

गाडीत पाच ते सहा विद्यार्थी होते. परंतु सुदैवाने सर्व विद्यार्थी सुखरूप बाहेर काढण्यात आले. चालकास किरकोळ दुखापत झाली असून एका विद्यार्थ्याच्या पायाला हलका मुका मार लागला आहे. ही गाडी तसेच विद्यार्थी शिपूर येथीलच असल्याचे समजते.

Advertisement

अपघात होताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. पाण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मोठी जीवितहानी टळल्याने परिसरात दिलासा व्यक्त केला जात आहे. प्रशासनाकडून अपघाताच्या कारणांची पुढील चौकशी सुरू आहे.

Advertisement
Tags :

.