महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे केरळात मुलाचा मृत्यू

07:00 AM Jul 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तलावात आंघोळ करताना नाकातून प्रवेश : तीन महिन्यांत मृत्यूची तिसरी घटना

Advertisement

वृत्तसंस्था /कोझिकोड

Advertisement

केरळमधील कोझिकोडमध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे (ब्र्रेन इटिंग अमिबा) होणाऱ्या संसर्गामुळे (अमीबिक मेनिंगोएन्से फलायटीस) एका 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. मृदुल असे संबंधित अल्पवयीनाचे नाव असून एका छोट्या तलावात आंघोळीसाठी गेला असता त्याला हा संसर्ग झाला होता. मृदुलवर एका खासगी इस्पितळात उपचार सुरू होते. याचदरम्यान बुधवारी रात्री 11.20 वाजता मृदुलचा मृत्यू झाल्याचे केरळच्या आरोग्य विभागाने गुऊवारी सांगितले. ‘प्राइमरी अमीबिक मेनिंगोएन्से फलायटिस’ किंवा पीएएम संसर्ग पाण्यात आढळणाऱ्या प्री-लिव्हिंग अमिबामुळे होतो.

सदर अमिबा नाकाच्या पातळ त्वचेतून शरीरात प्रवेश करतो, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ताप, डोकेदुखी, उलट्या आणि चक्कर येणे ही या आजाराची लक्षणे आहेत. मे 2024 पासून केरळमध्ये संसर्गाची ही तिसरी घटना आहे. 21 मे रोजी मलप्पुरममधील पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याचे पहिले प्रकरण घडले. त्यानंतर 25 जून रोजी कन्नूर येथील 13 वषीय मुलीचा मृत्यू झाला. यापूर्वी 2023 आणि 2017 मध्ये राज्याच्या किनारपट्टीवरील अलाप्पुझा जिह्यात हा आजार आढळून आला होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article