For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur : व्यंकटेश्वर देवस्थानात आजपासून ब्रह्मोत्सवास प्रारंभ

07:03 PM Oct 29, 2025 IST | NEETA POTDAR
solapur   व्यंकटेश्वर देवस्थानात आजपासून ब्रह्मोत्सवास प्रारंभ
Advertisement

                दाजी पेठेतील व्यंकटेश्वर देवस्थानात ५३वे ब्रह्मोत्सव

Advertisement

सोलापूर : पूर्व भागातील दाजी पेठेतील श्री व्यंकटेश्वर देवस्थानात बुधवार, २९ ऑक्टोबर ते सोमवार, ३ नोव्हेंबर या कालावधीत ब्रस्त्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष रायलिंग आडम यांनी दिली. तिरुमला तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर दाजी पेठ येथील व्यंकटेश्वर देवस्थानात ब्रम्होत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. यंदा ब्रह्मोसवाचे ५३ वे वर्ष आहे. या उत्सवात तिरुमलाचे पुरोहितवृंद धार्मिक विधी करणार असून विमतीला वाक्षिणात्य वाद्यवृंद राहणार आहे.

यंदा आयोजित केलेले विविध कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत. बुधवार दि. २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० ते ९ स्वस्तीवाचन, विश्वसेनाराधनम् पुण्याहवाचन, मृत्संग्रहणम्, वास्तुपूजा, रक्षाबंधन, अंकुरारोपणम्, शातुमुरै, तीर्थप्रसाद गोष्टी कार्यक्रम होणार आहेत. गुरुवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी पहाटे ५.३० वाजता 'श्रीं'च्या मूळमूर्तीस अभिषेक, सकाळी ९ ते ११.३० या वेळेत पालखी सेवा, ध्वजपट प्रतिष्ठापना, ध्वजारोहणम्, होमहवन, आराधना, शातुमुरै, सायंकाळी ६.३० ते ९ या कालावधीत आहे. .

Advertisement

पूजा, देवताआवाहन, होमहवन, शेषवाहन सेवा होईल.

शुक्रवार, ३१ ऑक्टोबर रोजी पहाटे ५.३० वाजता उत्सवमुर्तीस अभिषेक, सकाळी ८ द्वारतोरणा, ध्वजकुंभ, गजवाहन सेवा, आराधना, तिर्थप्रसाद गोष्टी, सायंकाळी ६ ते ९ होमहवन, स्वागत समारंभ (येदुरुकोल्लू), कल्याणोत्सवम्, तीर्थप्रसाद गोष्टी होणार आहे. शनिवार, १ नोव्हेंबर रोजी रोजी पहाटे ५ वाजता उत्सवमूर्तीस अभिषेक, सकाळी ९.३० वाजता होमहवन, पूर्णाहूती, हनुमान वाहनसेवा, तीर्थप्रसाद गोष्टी होणार आहे. रविवार, २ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता होमवन, अश्ववाहन सेवा, तीर्थप्रसाद गोष्टी, सकाळी ९ ते १२ या वेळेत मूळमुर्तीस ८१ उत्तमोत्तम कळशस्नपनम् (कळशाभिषेक), सायंकाळी ६ ते ९ या वेळेत गरुडवाहन सेवा, तीर्थप्रसाद गोष्टी, सोमवार, ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता होमहवन, सूर्यप्रभा वाहन सेवा, सकाळी ९ ते १२ या वेळेत होमहवन, चक्ररनानम् (चक्रतीर्थ), आराधना, शातुमुरै, तीर्थप्रसाद गोष्टी, १ नोव्हेंबर रोजी रथ मिरवणूक

शनिवार, १ नोव्हेंबर रोजी श्रींच्या उत्सव मूर्तीची रथ मिरवणूक काढण्यात येणार आहे. दुपारी ४ वाजता रथ मिरवणूक देवस्थानापासून निघणार आहे. जोडबसवण्णा चौक, राजेंद्र चौक, कन्नाचौक, औद्योगिक बैंक, मार्कंडेय चौक, जोडबसवण्णा चौक, भद्रावती पेठ, दत्त चौक, पद्मशाली चौकमार्गे दाजी पेठ देवस्थानजवळ रात्री मिरवणुकीचा समारोप होणार आहे.

सायंकाळी ५ ते ९ या वेळेत आराधना, चंद्रप्रभा वाहन सेवा, होमहवन, महापुर्णाहूती, देवतोउद्वासनम्, श्री पुष्पयागम्, द्वादशाराधना, वसंतोत्सवम् (वनविहार), ध्वजपट अवरोहणम्, शातुमुरै, कुंभप्रोक्षणम, तीर्थप्रसाद गोष्टी हे कार्यक्रम होऊन ब्रह्मोत्सवाचा समारोप होणार आहे. या उत्सवात भक्तगणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष रायलिंग आडम, विश्वस्त राजेशम येमुल, व्यंकटेश चिलका, जयेंद्र द्यावनपल्ली, लक्ष्मीनारायण कमटम, गोविंद बुरा, श्रीनिवास गाली, राजीव जक्कन, श्रीनिवास बोद्धूल आदींनी केले आहे.

Advertisement
Tags :

.