महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बीपीएल निमंत्रितांची बॅडमिंटन स्पर्धा आजपासून

10:40 AM Sep 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

12 संघांचा सहभाग, साखळी पद्धतीचे सामन्यांचे आयोजन

Advertisement

बेळगाव : बेळगाव जिल्हा शटल बॅडमिंटन व सोमशेखर खडबडी आयोजित तिसऱ्या बीपीएल निमंत्रितांची बॅडमिंटन स्पर्धा शनिवार दि. 28 पासून महाबळेश्वरनगर येथील बीडीबीएच्या बॅडमिंटन सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत नामांकित खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती सोमशेखर खडबडी यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाबळेश्वरनगर येथील बीडीबीएच्या सभागृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी साईनाथ मोहीते, ए. बी. मंथेरो, नौशाद बिजापूर, डॉ. दीपा मगदूम, कुमार ढवळी व विनय असुंडी उपस्थित होते.

Advertisement

सदर स्पर्धा सध्याची पिडी मोबाईल व इतर व्यसनामध्ये भरकटत असून व्यायामाकडे दुर्लक्ष करत आहे. अशा तरुणांना आपले शरीर सुदृढ व निरोगी राहण्यासाठी बीडीबीएने या स्पर्धांचे आयोजन केले आहे. जवळपास 11 संघांनी भाग घेतला असून बीपीएल स्टार्स, स्मॅश मास्टर, संकेश्वर रायडर्स, हिताची वॉरियर्स, रॅपटॉर्स, बीडीबीए मास्टर, फेदर फाटर्स, मास्टर ब्लास्टर, रॉयल रायडर्स, शटल स्मॅचर, चिकोडी चिटस आदी संघांनी यामध्ये भाग घेतला असून हे संघ तीन गटात विभागले असून साखळी पद्धतीने सामने खेळविले जातील. अव्वल गुण मिळविणारा संघ उपांत्य फेरीत प्रवेश मिळविणार आहे. जवळपास 100 खेळाडूंचा या स्पर्धेत सहभाग असून दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत रविवार दि. 29 रोजी बक्षीस वितरण होणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article