For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुमार व मुली राज्य अजिंक्यपद निवड चाचणी खो-खो स्पर्धा धाराशिवमध्ये

06:21 AM Oct 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
कुमार व मुली राज्य अजिंक्यपद  निवड चाचणी खो खो स्पर्धा धाराशिवमध्ये
Advertisement

प्रतिनिधी/ सोलापूर

Advertisement

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची 2024-25 वर्षातील सुवर्णमहोत्सवी (50 वी) कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा धाराशिव  जिल्हा खो-खो असोसिएशनच्या यजमान पदाखाली धाराशिव (उस्मानाबाद) येथे आयोजित करण्यात येत असल्याची घोषणा राज्य असोसिएशनचे सचिव डॉ. चंद्रजित जाधव यांनी केली आहे. या स्पर्धतून उत्तरप्रदेश येथे होणाऱ्या 43 व्या कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे.

सुवर्णमहोत्सवी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा धाराशिव (उस्मानाबाद) येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या निरज गॅस एजन्सीजवळील मैदानावर दि. 27 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत रंगणार आहे. या स्पर्धेसाठी 21 नोव्हेंबर 2006 रोजी अथवा त्यानंतर जन्मलेले 18 वर्षांखालील कुमार-मुलींचे 24 जिह्यातील संघ सहभागी होणार आहेत. 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पार पडणार असल्याचे राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, सचिव डॉ. चंद्रजीत जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अॅड. गोविंद शर्मा यांनी जाहीर केले. तसेच सर्व संघांना वेळेवर उपस्थितीत राहण्याचे सुध्दा कळविले आहे.

Advertisement

या स्पर्धेसाठी गटवारी पुढील प्रमाणे -

किशोर गट : अ-गट: सोलापूर, पालघर, जालना; ब-गट: पुणे, परभणी, बीड; क-गट: धाराशिव, रायगड, सिंधुदुर्ग; ड-गट: सांगली, सातारा, जळगाव; इ-गट: नाशिक, नंदुरबार, हिंगोली; फ-गट: मुंबई, रत्नागिरी, लातूर; ग-गट: ठाणे, धुळे, हिंगोली, छ. संभाजी नगर; ह-गट: मुंबई उपनगर, अहमदनगर, नांदेड.

किशोरी गट : अ-गट: धाराशिव, सातारा, परभणी; ब-गट: नाशिक, छ. संभाजी नगर, नंदुरबार; क-गट: सांगली, धुळे, सिंधुदुर्ग; ड-गट: ठाणे, जालना, हिंगोली; इ-गट: मुंबई उपनगर, लातूर, रायगड; फ-गट: पुणे, पालघर, जळगाव; ग-गट: सोलापूर, अहमदनगर, बीड; ह-गट: रत्नागिरी, मुंबई, नांदेड.

Advertisement
Tags :

.