For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

बॉयफ्रेंड...पुत्रापेक्षा एक वर्षाने मोठा

06:39 AM Mar 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
बॉयफ्रेंड   पुत्रापेक्षा एक वर्षाने मोठा

बॉयफ्रेंड...पुत्रापेक्षा एक वर्षाने मोठा 

Advertisement

मैत्री, रिलेशनशिप किंवा विवाह आदी कृत्ये सर्वसाधारणपणे समवयस्कांमध्ये होतात असे मानण्यात आले आहे. तीन-चार वर्षांचे अंतर चालते. वयात अधिक अंतर नसेल तर एकमेकांना समजून घेणे अधिक सुलभ होते, असे मानले जाते. तथापि, नियम किंवा प्रथा यांना अपवाद हे असतातच. काही अपवाद मात्र, अगदीच जगावेगळे असू शकतात. असाच एक प्रकार सध्या घडत आहे.

ही घटना अमेरिकेतली आहे. अमेरिकेच्या फ्लोरिडा शहरात रे रिचमंड नामक एक प्रौढ महिला आहे. तिला एक पुत्र आहे. तसेच एक बॉयफ्रेंडही आहे. हा बॉयफ्रेंड तिच्या पुत्रापेक्षा केवळ एक वर्षाने मोठा आहे. याचा अर्थ असा की, तो जवळपास तिच्या पुत्राच्या वयाचाच आहे. यासाठी या महिलेला अनेकांनी सोशल मिडियावर ‘ट्रोल’ही केले आहे. अनेकजण या जोडप्याला माता-पुत्राची जोडी असेच म्हणतात. पण कुणीही कितीही चेष्टा-मस्करी केली, तरी या महिलेला त्याचे काहीच वाटत नाही. पुत्राच्या वयाच्या बॉयफ्रेंडशी तिची रिलेशनशिप सुरुच आहे.

Advertisement

इतकेच नव्हे, आता तिने आपल्या बॉयफ्रेंडसमवेतचे रोमँटिक क्षणही सोशल मिडियावर प्रसिद्ध करण्यास प्रारंभ केला आहे. या दृष्यांना अनेकांनी पाहिले आहे. ही महिला सध्या नोकरी करते. पण आपल्या मित्रासाठी ती सोडण्यासही ही महिला तयार आहे. त्यांचे हे प्रेमप्रकरण 2023 पासूनचे आहे. मित्राशी विवाह करण्याचा विचार अद्याप तिने बोलून दाखविलेला नाही. पण तसे होणेही अशक्य नाही, असे तिच्या नजीकच्या संबंधितांचे म्हणणे आहे. ही महिला सध्या बरीच चर्चेत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.