भाडेतत्वावर बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड
व्हिएतनाममध्ये वाढत्या जबाबदाऱ्या, सामाजिक तणाव आणि कारकीर्द घडविण्याच्या प्रयत्नांमुळे युवांच्या विवाहाला विलंब होत आहे. दुसरीकडे त्यांचे पालक त्यांच्यावर विवाहाचा दबाव आणत आहेत. याचमुळे व्हिएतनाममधील लोक स्वत:च्या आईवडिलांना आनंदी ठेवणे आणि त्यांची देखभाल करण्यासाठी भाडेतत्वावर जोडीदार हायर करत आहेत. साशल मीडियावर भाडेतत्वावर जोडीदार मिळविणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे. तर युवक आणि युवती कुटुंबीयांच्या दबावात असे पाऊल उचलत आहेत. तर जोडीदार हायर करण्याच्या काही अटी देखील आहेत.
30 वर्षीय मिन थूने कुटुंबीयांच्या वारंवार विवाह करण्याच्या दबावामुळे एका बॉयफ्रेंडला घरी आणले आहे. जेव्हा तिला कुठलाच जोडीदार न मिळाल्याने तिला एका युवकाला हायर करत त्याला बॉयफ्रेंड करत घरी आणले आहे. तर भाडेतत्वावरील जोडीदार होत घरी पोहोचलेल्या युवकाला स्वयंपाक करता येतो आणि जेव्हा तो सामाजिक स्वरुपात योग्य वाटल्यावर मिन थूच्या कुटुंबीयांनी त्याला आपलं मानलं आहे. तर कान्ह गॉक नावाच्या महिलेने देखील एक हँडसम पार्टनर हायर केला, जो कान्ह गॉकच्या कुटुंबीयांना पसंत पडला आहे. याचबरोबर कान्ह गॉकचे देखील स्वत:च्या कुटुंबासोबत उत्तम बॉन्डिंग जमले आहे. तर 25 वर्षीय हुय तुआनने ‘फेक बॉयफ्रेंड’ होण्याचा व्यवसायच निर्माण केला आहे. तो कॅज्युअल डेटपासून फॅमिली फंक्शनपर्यंत स्वत:च्या ग्राहकांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी मोठे प्रशिक्षण घेतो. यात स्वयंपाक करणे, कपडे धुणे यासारख्या घरगुती कामांसोबत नातेवाईकांमध्ये वावरण्याचे प्रशिक्षण देखील सामील आहे.
तर तज्ञांनी या कामाला जोखिमयुक्त आणि तात्पुरते ठरवत पुढील काळात ते समस्येचे कारण ठरू शकते असे म्हटले आहे. फेक पार्टनरचे रहस्य उघड झाले तर यामुळे कुटुंबाला भावनात्मक धक्का बसू शकतो. याचबरोबर व्हिएतनाममध्ये भाडेतत्वावर जोडीदार घेणे कायदेशीर दृष्ट्या सुरक्षित नाही, खासकरून महिलांना याची काळजी घ्यावी लागेल असे तेथील पत्रकारिता आणि संचार अकॅडमीच्या संशोधिका गुयेन थान नगा यांनी म्हटले आहे. आकर्षक कारकीर्दीशिवाय विवाह करण्याचा प्रयत्न केल्यास लाखो समस्या निर्माण होतात आणि अशा स्थितीत भाडेतत्वावर जोडीदार मिळविणे चांगला निर्णय आहे. हा निर्णय पालकांना आनंदी ठेवतो आणि युवांवरी भार कमी करतो असे एका युजरने नमूद केले आहे.